Goa : गोव्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांचे निधन

एमपीसी न्यूज – गोवा राज्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांचे नुकतेच निधन झाले. आज पर्रीकर यांनी अखेरचा श्वास घेतला. शनिवारपासूनच त्यांच्या तब्येतीबाबत राज्यासह देशभर अफवा पसरल्या होत्या. दरम्यान, सकाळी मनोहर पर्रीकर यांची तब्येत ठीक असून ते फक्त डोळे उघडतात, असे सांगितले जात होते. मात्र, ही अफवा आज खरी ठरली.

मागील पंधरा दिवसांत दोनवेळा त्यांचा रक्तदाब एकदम कमी झाला होता. मात्र, त्यांना कृत्रिम ऑक्सिजन देण्यात आल्यानंतर त्यांची प्रकृतीत काहीशी सुधारणा झाली होती. शनिवारी सायंकाळी त्यांची स्थिती चिंताजनक होती.

  • अनेक दिवसांपासून ते मृत्युशी झुंज देत होते. पर्रीकर यांच्या निधनाच्या वृत्ताने शोकाकूल वातावरण निर्माण झाले. मागील वर्षांपासून ते कर्करोगाच्या आजाराने त्रस्त होते. त्यांनी यावर मात करण्यासाठी देशासह विदेशात उपचार घेतले होते.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.