Goa News : पै. तानाजी जाधव यांचा नेल्सन मंडेला नोबेल शांतता पुरस्काराने गौरव

एमपीसीन्यूज : तब्बल 2200 हून अधिक कोरोना मृतांवर अंत्यसंस्कार, महिला सक्षमीकरण तसेच युवकांचे असंख्य प्रश्न सोडविण्यासह मुंबईतील एल्फिन्स्टन दुर्घटना, कोल्हापूर आणि केरळ येथील पूरग्रस्तांसाठी केलेली भरीव मदत आदी विविध सेवाभावी कार्याची दखल घेत टायगर ग्रुपचे राष्ट्रीय अध्यक्ष पै. तानाजी जाधव यांचा नेल्सन मंडेला नोबेल शांतता पुरस्कार देऊन गौरव करण्यात आला.

गोवा येथे नुकत्याच संपन्न झालेल्या कार्यक्रमात नेल्सन मंडेला नोबेल पिस अवॉर्ड अकादमीचे चेअरमन डॉ. राजकुमार टाक यांच्या हस्ते जाधव यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. यावेळी अमेरिकन युनिव्हर्सिटी ऑफ ग्लोबल पिस या विद्यापीठाची मानद डॉक्टरेट पदवीही जाधव यांना सन्मानपूर्वक प्रदान करण्यात आली.

या प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून अमेरिकन युनिव्हर्सिटी ऑफ ग्लोबल पिस विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. मधुकृष्णन व बॉस्नियाचे राजदूत सुहास मंत्री, नेल्सन मंडेला नोबेल पिस अवॉर्ड अकादमीचे चेअरमन डॉ. राजकुमार टाक, उपाध्यक्ष डॉ. विजय सिंह पाटील, सेक्रेटरी जोशुआ इमान्यल तसेच पुणे जिल्ह्यातील मावळ विधानसभेचे युवा सेना प्रमुख अनिकेत घुले, सामाजिक कार्यकर्ते योगेश मालखरे, अजित भोसले आदी उपस्थित होते.

याच कार्यक्रमात टेनिसपटू लिएंडर पेस , कुस्तीपटू संग्राम सिंग, अभिनेत्री झरीन खान, कर्नल शैलेंद्र सिंग, व्यावसायिक राकेश झुनझुनवाला यांनाही डॉक्टरेट पदवीने सन्मानित करण्यात आले.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.