Pune Crime News: महालक्ष्मी देवीच्या अंगावरील मोहनमाळ आणि सोन्याचे गंठण चोरीला

एमपीसी न्यूज : बंद घराची कडी उघडून प्रवेश करीत देवघरातील महालक्ष्मी देवीच्या अंगावर असणारी मोहनमाळ आणि सोन्याचे गंठण चोरून नेले आहे. सासवड पोलिस स्टेशनच्या हद्दीत बुधवारी सकाळी हा प्रकार उघडकीस आला. याप्रकरणी रजनी शांताराम महाजन (वय 70) यांनी फिर्याद दिली असून अज्ञात चोरट्याविरुद्ध सासवड पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला. 

चोरट्यांनी देवघरातून चार तोळ्याची तीन पदरी मोहनमाळ आणि तीन तोळे वजनाचे सोन्याचे गंठण आता एकूण 2 लाख 11 हजार 840 रुपयांचा मुद्देमाल चोरून नेला.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी बुधवारी दाराला कडी लावून बाहेर गेल्या होत्या. हीच संधी साधून अज्ञात चोरट्याने सकाळी दहा ते दुपारी दीड या यादरम्यान घराची कडी उघडून आत प्रवेश केला आणि देवघरात महालक्ष्मीचा अंगावर असणारे वरील सोन्याचे दागिने चोरून नेले. पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून अधिक तपास पोलीस निरीक्षक दगडू हाके करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.