Ashoknagar : अशोकनगर येथे गोडाऊनला आग; 30 लाखांचे नुकसान

एमपीसी न्यूज – पिंपरीमधील अशोकनगर (Ashoknagar) येथे एका गोडाऊनला 18 एप्रिल रोजी आग लागली. या आगीत गोडाऊनमधील 30 लाख रुपयांच्या मालाचे नुकसान झाले. या प्रकरणी अज्ञाताच्या विरोधात 23 मे रोजी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याप्रकरणी लक्ष्मण पोपट भालेराव (वय 36, रा. पिंपरी) यांनी पिंपरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

Pune Crime News : मित्राच्या मदतीने पत्नीचे चोरले दागिने; पतीसह मित्रास अटक

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांचे अशोकनगर (Ashoknagar) पिंपरी येथे पत्र्याचे गोडाऊन आहे. 18 एप्रिल रोजी रात्री पावणे बारा वाजताच्या सुमारास अज्ञाताने फिर्यादी यांच्या गोडाऊनला आग लावली. गोडाऊनमध्ये फोटो फ्रेमचे बॉक्स, एम डी एफ (की बोर्ड) व फोटो फ्रेम तयार करण्याचे कॉम्प्रेसर मशिनरी असे एकूण 30 लाखांचे साहित्य जळून नुकसान झाले. या प्रकरणाचा पिंपरी पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.