_MPC_DIR_MPU_III -NEW PUN  21 JUN 2021

Chikhali News: रासायनिक पावडरची पोती असलेल्या गोदामामुळे नागरिकांना त्रास; गोदाम सील

0

एमपीसी न्यूज – चिखली स्पाईन रोड, नक्षत्र सोसायटी शेजारी एका गोदामात रासायनिक पावडरची पोती टाकली जात असल्याचा प्रकार निदर्शनास आला आहे. यामुळे परिसरातील नागरिकांना दुर्गंधीचा सामना करावा लागत होता. परिणामी, नागरिकांमध्ये श्वसनाचा त्रासाच्या तक्रारी वाढल्या होता.

याकडे महापालिका अधिकारी, पदाधिकाऱ्यांनी सोयीस्करपणे दुर्लक्ष केले. याबाबत नागरिक सातत्याने तक्रारी करत होते. नागरिकांच्या तक्रारींचा भडीमार होत असल्याने अखेर महापालिका पर्यावरण विभागाने बुधवारी पाहणी करून गोदाम सील केले आहे.

महापालिकेकडे तक्रार आल्यानंतर महापालिका पर्यावरण विभागाचे कार्यकारी अभियंता संजय कुलकर्णी, माजी सत्तारूढ पक्षनेते एकनाथ पवार आणि अधिकारी यांचे पथक घटनास्थळी गेले आणि गोदाम सील केले. चिखली स्पाईन रोड, नक्षत्र सोसायटी शेजारी, चेरिज स्वीटसच्या समोर मोकळया प्लॉटमध्ये दगड मातीसह कुदळवाडीतील कचरा आणून टाकला जात आहे.

याशिवाय काही पोती आणली जात आहेत. 16 फेब्रुवारीला पहाटे या ठिकाणी आग लागली. त्यानंतर आग लागण्याच्या घटना सातत्याने घडत आहेत.  अग्निशामक दलाने आतापर्यंत दोन वेळा येवून आग विझवली.

_MPC_DIR_MPU_II

आगामीमुळे या भागात पुन्हा धूर वाढत आहे. त्यामुळे आजूबाजूच्या परिसरात असणा-या नागरिकांना श्वसनाचा त्रास जाणवत आहे. या परिसरात मोठ मोठ्या गृहनिर्माण सोसायट्या आहेत. या भागात नागरिकरण वाढले असून दाट लोकवस्ती झाली आहे. हा परिसर प्राधिकरणाच्या  हद्दीत आहे.

त्यामुळे आमच्या आरोग्याचा विचार करून गोदामावर कारवाई करावी, अशी मागणी नागरिकांकडून केली जात होती. येथील पोती अमोनियाची आहेत, असा आक्षेप नागरिकांनी घेतला आहे.

एका गोदामामध्ये रासायनिक पावडरची पोती पडलेली आहेत. तसेच परिसरातही अनेक पोती आहेत. त्यावर पाणी पडले की त्यातून धूर येतो. हा धूर शेजारी असणाऱ्या सोसायट्यांमध्ये जात आहे. हा उग्र वास असल्याची तक्रार नागरिकांनी केली होती. ही पोती कोणत्या पावडरची आहेत, याबाबत पर्यावरण विभागास माहिती मिळालेली नाही. गोदाम सील केले आहे.

माजी सत्तारूढ पक्षनेते एकनाथ पवार म्हणाले, ”सोसायटीच्या जवळच असणा-या मोकळ्या जागेत काही पोती आणून टाकली जात असल्याच्या तक्रारी नागरिकांनी केल्या होत्या. त्यामुळे या ठिकाणी महापालिकेचे पथक गेले आणि गोडाऊन  सील केला आहे”.

पर्यावरण विभागाचे कार्यकारी अभियंता संजय कुलकर्णी म्हणाले, ”एका गोदामामध्ये रासायनिक पावडरची पोती असून त्यामुळे दुर्गंधी येत असल्याची तक्रार नागरिकांनी केली होती. त्यानुसार पाहणी केली असता, पोत्यांवर पाणी पडले की धूर निघत होता. ही पावडर रासायनिक असावी, असे जाणवल्याने गोदाम सील करून प्रदूषण नियंत्रण मंडळास कळविले आहे”.

 

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Leave a comment