Godse school : मध्य प्रदेशात हिंदू महासभेने सुरू केली ‘गोडसे ज्ञान शाळा’

0

एमपीसी न्यूज: मध्यप्रदेशमध्ये हिंदू महासभेने गोडसे ज्ञान शाळेचे उद्घाटन केले आहे. हिंदू महासभेने त्यांच्या ग्वालियर येथील दौलतगंज कार्यालयात नथुराम गोडसे यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून ज्ञान ज्ञान शाळेचे उद्घाटन केले.

या माध्यमातून तरुण पिढीला विविध राष्ट्रीय नेत्यांबद्द्ल तसेच फाळणीचे विविध पैलू याबद्दल माहिती देण्यात येणार असल्याचे हिंदू महासभेचे उपाध्यक्ष जयवीर भारद्वाज यांनी सांगितले .

रविवारी (दि. 10) रोजी ग्वालियरमधील हिंदू महासभेच्या कर्यालयाताच ही ज्ञान शाळा सुरू करण्यात आलेली आहे. यावेळेस ‘हुतात्मा पंडीत नथुराम गोडसे अमर रहे’, ‘अखंड भारत होणारच’, ‘हिंदुस्तान हिंदुंचाच’, अशा घोषणा देण्यात आल्या.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.