Chakan : घरफोडी करून सोन्या-चांदीचे दागिने आणि रोकड पळवली

एमपीसी न्यूज – कुलूप लावून बंद असलेल्या घरात घरफोडी करून अज्ञात चोरट्यांनी घरातून सोन्या-चांदीचे दागिने आणि रोख रक्कम असा एकूण एक लाख 15 हजारांचा ऐवज चोरून नेला. हा प्रकार 23 ते 27 नोव्हेंबर या कालावधीत नाणेकरवाडी, चाकण येथे घडला.

योगेश ज्ञानेश्वर चौधरी (वय 40, रा. नाणेकरवाडी, चाकण) यांनी याबाबत शनिवारी (दि. 28) चाकण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी अज्ञात चोरट्याच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी चौधरी यांचे घर 23 नोव्हेंबर रोजी सकाळी पावणे आठ ते 27 नोव्हेंबर रोजी सकाळी पावणे बारा या कालावधीत कुलूप लावून बंद होते. त्या काळात अज्ञात चोरट्यांनी दरवाजाचा कडी-कोयंडा तोडून आत प्रवेश केला.

घरातून सोन्याची अंगठी, कानातील टॉप्स, गळ्यातील चेन, गळ्यातील बदाम, कानातील बाळ्या, चांदीचे पायातील जोडवे, देवीच्या मूर्ती, पायातील पट्ट्या, कमरेची चेन इत्यादी दागिने, 40 इंची एलसीडी टीव्ही, 15 हजार रुपये रोख रक्कम असा एकूण एक लाख 15 हजारांचा ऐवज चोरून नेला. तसेच चोरट्यांनी एसबीआय बँकेचे एटीएम कार्ड, आयडीबीआय बँकेचे एटीएम कार्ड, पॅनकार्ड आणि इतर वस्तूही चोरून नेल्या असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. चाकण पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.