Bhosari : पीएमपी बसमध्ये चढताना महिलेच्या हातातून सोन्याची बांगडी पळवली

Gold bangel was snatched from old lady's hand while boarding the PMP bus.

एमपीसी न्यूज – पीएमपी बसमध्ये चढत असताना अज्ञात चोरट्यांनी महिलेच्या हातातील 70 हजार रुपये किमतीची सोन्याची बांगडी कट करून चोरून नेली. ही घटना सोमवारी (दि. 19) दुपारी पावणे एक वाजता भोसरी येथील पीएमपीएमएल बस थांब्यावर घडली.

सुलोचना ज्ञानदेव हिरे (वय 60, रा. राजगुरूनगर, ता. खेड) यांनी याबाबत मंगळवारी (दि. 20) भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी अज्ञात चोरट्याच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी त्यांच्या पतीसोबत त्याच्या मुलाला भेटण्यासाठी खेड शिवापूर येथे जात होत्या. सोमवारी दुपारी पावणे एक वाजता भोसरी येथील पीएमपीएमएल बस थांब्यावरून त्या कात्रजकडे जाणा-या बसमध्ये चढत होत्या.

बसमध्ये चढताना अज्ञात चोरट्याने फिर्यादी यांच्या हातातील 70 हजार रुपये किमतीची सोन्याची बांगडी कट करून चोरून नेली. भोसरी पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

_MPC_DIR_MPU_III