Bhosari Crime News : उघड्या दरवाज्यातून प्रवेश करून घरातून सोन्याच्या दोन बांगड्या पळवल्या

एमपीसी न्यूज – अज्ञात चोरट्याने उघड्या दरवाज्यातून घरात प्रवेश करत घरातून 50.110 ग्रॅम वजनाच्या दोन सोन्याच्या बांगडया चोरून नेल्या. ही घटना 25 सप्टेंबर रोजी माळी आळी, भोसरी येथे उघडकीस आली.

हनुमंता कुंडलिक लोंढे (वय 45, रा. माळी आळी, भोसरी) यांनी याप्रकरणी बुधवारी (दि. २९) भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार अज्ञात चोरट्याच्या विरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 16 सप्टेंबर रोजी सकाळी दहा ते 25 सप्टेंबर रोजी सकाळी नऊ वाजताच्या कालावधीत फिर्यादी यांच्या घराच्या उघड्या दरवाज्यातून घरात प्रवेश करून चोरट्याने कपाटातून 72 हजार 500 रुपयांच्या 50.110 ग्रॅम वजनाच्या सोन्याच्या दोन बांगड्या चोरून नेल्या.

फिर्यादी यांच्या आईने घरातील लोखंडी कपाटात त्यांच्या बांगड्या ठेवल्या होत्या. 25 सप्टेंबर रोजी सकाळी त्यांना बांगड्या घालायच्या असल्याने त्यांनी कपाट उघडून पाहिले असता बांगड्या मिळाल्या नाहीत. त्यामुळे सर्वत्र शोध घेतल्यानंतर याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी भोसरी पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.