Chain Snatching : पालखीचे दर्शन घेत असताना हिसकावली सोन्याची चैन; गुन्हा दाखल

एमपीसी न्यूज – संत तुकाराम महाराज पालखीचे दर्शन घेत असताना देहूगाव मध्ये 21 जून रोजी एकाची सोन्याची चैन (Chain Snatching) अज्ञात चोरट्याने हिसकावली.

याबाबत उमेश पाटील (वय 43 वर्षे, माळीनगर, देहूगाव) यांनी देहू रोड पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

Pune Suicide Case : पत्नीचे अनैतिक संबंध समजल्यानंतर पतीची आत्महत्या

मिळालेल्या माहितीनुसार, फिर्यादी व त्यांचा मुलगा असे दोघे संत तुकाराम महाराज यांच्या पालखीचे दर्शन घेण्यासाठी परंडवाल चौक येथे 21 जून रोजी सकाळी 11.30 च्या सुमारास गेले असताना सदर ठिकाणी गर्दीचा फायदा घेऊन अज्ञात चोरट्याने फिर्यादीचे गळ्यातील 10 ग्राम वजनाची सोन्याची चैन (Chain Snatching) 12,000 रुपये अंदाजे किंमतीची धक्का मारून जबरदस्तीने पळवून नेली.

याप्रकरणी अज्ञात चोरट्या विरोधात भा. द. वि कलम 392 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.