-MPC-TOP-MOST-BANNER-I

Gold News : सोन्यात 24 कॅरेट इतिहासजमा ; यापुढे 14, 18 व 22 कॅरेटमध्ये मिळणार सोने, हॉलमार्किंगही अनिवार्य

-MPC-FIRST-TOP-BANNER-I

एमपीसी न्यूज – सोन्यात 24 कॅरेट ही संकल्पना आता इतिहासजमा होणार आहे. यापुढे फक्त 14, 18 व 22 कॅरेटमध्येच सोने मिळणार आहे. आजपासून देशात गोल्ड हॉलमार्किंगही अनिवार्य करण्यात आले आहे. थोडक्यात आजपासून हॉलमार्क केलेलं 14, 18 व 22 कॅरेटचे सोने ज्वेलर्समध्ये मिळणार आहे.

गोल्ड हॉलमार्किंग म्हणजे सोन्याच्या शुद्धतेचे एक प्रमाणपत्र आहे. आजपासून सर्व ज्वेलर्सना केवळ 14 कॅरेट, 18 कॅरेट आणि 22 कॅरेटचे सोनेच विकण्याची परवानगी असेल. BIS एप्रिल 2000 पासून गोल्ड हॉलमार्किंगची स्किम चालवत आहे.

सध्या केवळ 40 टक्के ज्वेलर्सचेच हॉलमार्किंग झालेली आहे. सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे सोन्यावर यापुढे ते किती कॅरेटचे सोने आहे, हे लिहिलेले असेल. तसेच, हॉलमार्किंगमुळे सामान्य लोकांना फायदा होणार आहे.

प्रत्येक कॅरेटच्या सोन्यासाठी हॉलमार्क नंबर टाकले जातात. ज्वेलर्सकडून 22 कॅरेटसाठी 916 नंबरचा वापर केला जातो. 18 कॅरेटसाठी 750 नंबरचा वापर केला जातो आणि 14 कॅरेटसाठी 585 नंबरचा वापर केला जातो.

कुठलाही ज्वेलर्स हॉलमार्किंग शिवाय सोने विकताना आढळून आल्यास त्याच्यावर कठोर कारवाई केली जाईल. यात एक वर्षाच्या शिक्षेशिवाय, त्याच्याकडून सोन्याच्या रकमेच्या पाच टक्के दंडही वसून केला जाऊ शकतो.

दरम्यान, गोल्ड हॉलमार्किंगच्या नव्या नियमांचा घरात असलेल्या सोन्यावर कसल्याही प्रकारचा परिणाम होणार नाही. तसेच जुन्या दागिन्यांची विक्री करतानाही याचा काही परिणाम होणार नाही.

.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

_MPC_POSTEND_MAT_1POST DOWn