Punavale Crime News : बनावट चावीने घर उघडून सोन्याचे दागिने व रोकड लंपास

एमपीसी न्यूज – अज्ञात चोरट्याने बनावट चावीच्या साहाय्याने घर उघडून घरातून सोन्याचे दागिने आणि रोख असा एकूण एक लाख 85 हजारांचा ऐवज चोरून नेल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. ही घटना रविवारी (दि. 12) सायंकाळी सहा ते रात्री सव्वानऊ या कालावधीत पुनावळे माळवाडी येथे घडली.

जालिंदर महादेव काटे (वय 31, रा. माळवाडी, पुनावळे) यांनी याबाबत हिंजवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. या प्रकरणी अज्ञात चोरट्याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी काटे त्यांच्या कुटुंबासोबत त्यांच्या बहिणीकडे जांबे येथे गौरी पुजनानिमित्त गेले होते. दरम्यान त्यांचे घर कुलूप लावून बंद होते, परंतु अज्ञात चोरट्याने बनावट चावीच्या सहाय्याने दरवाजा उघडून आत प्रवेश केला आणि लाकडी कपाटातील लॉकर मध्ये ठेवलेले 6.1 तोळे सोन्याचे दागिने, दोन हजार रोख रक्कम असा एकूण एक लाख 85 हजार रुपयांचा ऐवज लंपास केला. फिर्यादी बहिणीच्या गावाहून आल्यानंतर हा प्रकार उघडकीस आला असून या प्रकरणी हिंजवडी पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.