Gold price : सोन्याच्या दरात भरमसाट वाढ, गुढी पाडव्याच्या आधीच भाव पोहोचला 72000 रुपये प्रति तोळा

एमपीसी न्यूज – नवीन आर्थिक वर्षं चालू झाल्यापासून सोन्याच्या दरात दररोज विक्रमी वाढ (Gold price) होत असून आज (दि. 4 एप्रिल) रोजी  सोन्याच्या भावात ऐतिहासिक वाढ झाली असून 24 कॅरेट शुद्धतेचे सोने प्रति  10 ग्रॅम  72000 प्रति तोळा पोहोचले असून चांदीचे भाव ७५७६० रु. प्रति ग्रॅम झाले आहेत. ऐन सणासुदीच्या आणि लग्नसराईच्या  काळात सोन्याच्या भावात विक्रमी वाढ झाल्यामुळे सामान्य माणसाच्या खिशाला कात्री बसणार आहे. 

Pimpri :डॉ. डी. वाय. पाटील मेडिकल कॉलेजमध्ये शरीर रचनाशास्त्र विषयावर आंतरराष्ट्रीय परिषदेस प्रारंभ

सोन्याच्या दरामध्ये वाढ होण्याची मुख्य करणे म्हणजे सध्या चालू असलेल्या भू-राजकीय घडामोडी, अमेरिकेच्या फेडरल रिझर्व्ह बँक कडून व्याजदर कपातीचे संकेत असे तद्यांचे म्हणणे आहे. सध्या जागतिक पटलावर चालू असलेल्या रशिया-युक्रेन  मधील युद्ध, इस्राईल – हमास मधील संघर्ष आदी कारणांमुळे सोन्याच्या दरात विक्रमी वाढ होत असल्याचे दिसून येत आहे. जेव्हा अमेरिकेच्या फेडरल बँक व्याज दरात कमी करण्याचे संकेत मिळतात तेव्हा सोन्याच्या दरात वाढ झाल्याचे दिसून आले आहे. सामान्य माणूस नेहमी सोन्याकडे दीर्घकालीन गुंतवणूकीचा शाश्वत पर्याय म्हणून पाहत असतो व सोन्यामध्ये आपल्या उज्ज्वल भविष्यासाठी गुंतवणूक करत असतो.अमेरिकेत व्याजदर कपातीनंतर सोन्याचा भाव (Gold price) अजून वाढू शकतो असे  पी.एन. जी. सन्सचे मुख्य  कार्यकारी अधिकारी अजित मोडक यांनी म्हटले आहे.

 

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.