Business news : दसऱ्याच्या दुसऱ्याच दिवशी सोन्याचे दर उतरले

एमपीसी न्यूज  : दस-याच्या (Dussehra) निमित्ताने सोने खरेदी करणा-या ग्राहकांनी यंदाही सोने खरेदीवर अपेक्षेप्रमाणे गर्दी केली. काही ठिकाणी सोन्याच्या दुकानात तुडूंब गर्दी पाहायला मिळाली तर काही ठिकाणी सोने खरेदीला संमिश्र परिणाम पाहायला मिळाला. मात्र दस-याच्या शुभमुहूर्तावर सोने खरेदी करण्याची पूर्वापार चालत आलेली प्रथा यंदाही कायम ठेवली. दस-याच्या दिवशी सोन्याला चांगलीच झळाळी आली होती. त्यामुळे कालचे सोन्याचे दर (Gold Rate) हे मुंबईत प्रतितोळा 51,200 रुपये होते. मात्र आज म्हणजेच दस-याच्या दुस-याच्या दरात काहीशी घट झालेली पाहायला मिळत आहे.

पाहूयात मुंबई, पुणे, नवी दिल्लीसह अन्य शहरांतील सोन्याचे दर

शहर24 कॅरेट/प्रतितोळा22 कॅरेट/प्रतितोळा
मुंबई51,050 रुपये50,050 रुपये
पुणे51,050 रुपये50,050 रुपये
चेन्नई51,510 रुपये47,220 रुपये
हैदराबाद51,510 रुपये47,220 रुपये
नवी दिल्ली52,890 रुपये49,400 रुपये
बंगळूरू51,710 रुपये50,110 रुपये
नागपूर51,050 रुपये50,050 रुपये
चंदिगड़52,350 रुपये48,800 रुपये

 

यंदा कोरोना व्हायरसमुळे सर्व सणांचा उत्साह म्हणावा तसा पाहायला मिळाला नाही.सण म्हटले की लोक एकत्र येतात आणि एकत्रित येऊन आनंदाने सण साजरे करतात. मात्र यंदा सोशल डिस्टंसिंगच्या नियमांमुळे आपल्याला तसे करता आले नाही. पण आता हा देशातील महत्त्वाच्या सणांचा मोसम सुरु होत असल्याने तो उत्साह हळूहळू पाहायला मिळत आहे. त्याची प्रचिती काल दस-याच्या मुहूर्तावर झालेल्या सोने खरेदीवर दिसून आली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.