Gold Rate Hike : सोन्या-चांदीच्या दराचा नवा उच्चांक ! सोनं 50 हजारांपार; चांदी 61 हजारांच्यापुढे

Gold-silver prices hit new highs Gold beyond 50 thousand; Silver ahead of 61 thousand

एमपीसी न्यूज – कोरोना संकट काळात देशभरात सोन्या-चांदीच्या दरात मोठी वाढ होताना पाहायला मिळत आहे. बुधवारी(दि.22) भारतीय सराफ बाजारात सोन्या-चांदीच्या दराने तर नवा उच्चांक गाठला आहे. चांदीचे दर 61 हजार रुपये प्रति किलोग्राम झाले, तर सोन्याच्या दरांनीही प्रति 10 ग्रामसाठी 50 हजार रुपयांचा आकडा ओलांडला.

मल्टी कमोडिटीज एक्सचेंजवर चांदीच्या सप्टेंबर महिन्यासाठीच्या किंमतीमध्ये बुधवारी 3208 अर्थात 5.59 टक्क्यांची वाढ झाली. यानंतर या चांदीची किंमत 61,150 रुपये प्रति किलोवर ट्रेंड करत आहे.

एमसीएक्सवर चांदी 58,000 रुपये दराने ट्रेंड करण्यास सुरूवात झाली. त्यानंतर 61,200 रुपये प्रति किलोच्या सर्वोच्च स्तरावर पोहोचली आहे. गेल्या सात-आठ वर्षांमधील चांदीचे हे सर्वाधिक दर असल्याचं सांगितलं जात आहे.

सोन्याच्या किंमती 50 हजार रुपये प्रति तोळा झाल्या आहेत. बुधवारी एमसीएक्सवर सुरूवात होताच सोन्याचे दर 49,931 रुपयांवरुन थेट 50,020 रुपये प्रति 10 ग्रामच्या उच्चांकी स्तरावर पोहोचले.

कोरोना संकटकाळात सुरक्षित गुंतवणूकीचा पर्याय म्हणून सोन्या चांदीतील गुंतवणूक वाढल्याची शक्यता तज्ज्ञांनी वर्तवली आहे.

तर, अनलॉकनंतर इंडस्ट्रीयल डिमांड वाढल्यामुळेही चांदीच्या दरात वाढ झाली असू शकते, असं तज्ज्ञांचं म्हणणं आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.