Chikhali : घरफोडी करून सोन्या-चांदीचे दागिने लंपास

Golden-silver ornaments robbed by burglary in Morewasti, Chikhali.

एमपीसी न्यूज – घराला कुलूप लाऊन सासू-सासऱ्यांच्या घरी रात्री झोपण्यासाठी गेलेल्या महिलेच्या घरी अज्ञात चोरट्यांनी चोरी केली. चोरट्यांनी घरातून 34 हजार 200 रुपयांचे सोन्या-चांदीचे दागिने चोरून नेले. ही घटना मंगळवारी (दि. 28) पहाटे घडली.

सीमा अरविंद बहिरट (वय 40, रा. मोरेवस्ती, चिखली) यांनी याप्रकरणी चिखली पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी अज्ञात चोरट्याच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सोमवारी रात्री फिर्यादी बहिरट घराला कुलूप लाऊन त्यांच्या सासू-सासऱ्यांच्या घरी झोपण्यासाठी गेल्या होत्या.

रात्री अज्ञात चोरट्यांनी घराचे कुलूप तोडून घरात प्रवेश केला.

घरातून 12 चांदीचे पैजण जोड, चार चांदीच्या कमरपट्ट्या, आणखी एक पैंजण, चांदीची जोडवी, सोन्याची अंगठी असा एकूण 34 हजार 200 रुपयांचा ऐवज चोरून नेला. मंगळवारी सकाळी हा प्रकार उघडकीस आला. चिखली पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.