Lonavala : लाडक्या बाप्पांना भावपूर्ण वातावरणात निरोप

घरगुती गौरी गणपतींचे पाचव्या दिवशी विसर्जन

एमपीसी न्यूज – गणपती बाप्पा मोरया…मंगलमूर्ती मोरया… पुढच्या वर्षी लवकर या… चा जयघोष करत मोठ्या भावपूर्ण वातावरणात व उत्साहात आज गावोगावी लाडक्या गणरायाला व गौरी देवीचा निरोप देण्यात आला.

पावसाने चांगली उघडीप दिल्याने अबालवृद्धांसह महिला मोठ्या संख्येने विसर्जन कार्यक्रमात सहभागी झाल्या होत्या. दुपारी दोननंतर घरोघरी आरत्या करत वाजतगाजत गणरायांची मिरवणूक सुरु झाली. काही ठिकाणी इंद्रायणी नदीपात्रात तर काही ठिकाणी खाणींमध्ये हे विसर्जन करण्यात आले. विसर्जनापूर्वी महिलांनी फेर धरत मंगळागौरीची गाणी म्हणत टाळी फुगडीचे खेळ खेळले तर लहान मुले व नागरिक यांनी नाचत वाजत गाजत बाप्पांना निरोप दिला.

लोणावळा शहरासह वरसोली, वाकसई, कुसगाव, डोंगरगाव, कुणेगाव, कुरवंडे, देवघर य‍ लोणावळा शहरालगतच्या गावांमध्ये ढोल ताश्यांच्या गजरात वाजत गाजत मिरवणूक काढत घरच्या बाप्पांना आज निरोप देण्यात आले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.