Good News : 99.9 टक्के विषाणू मारणारा नोझल स्प्रे ; इस्त्राईलमध्ये उत्पादन सुरू

एमपीसी न्यूज – 99.9 टक्के विषाणूंचा खात्मा करण्याची क्षमता असलेला नोझल स्प्रे बाजारात येत आहे. इस्त्राईलमध्ये या नाकावाटे घ्यायच्या स्प्रेचे उत्पादन सुरू झालं आहे. या स्प्रेच्या वापरामुळे जगातील कोरोना संसर्गाला मोठ्या प्रमाणावर रोखता आलं असतं, असा दावा स्प्रेच्या संशोधक डॉ. गिली रेगेव्ह यांनी केला आहे.

डॉ. रेगेव्ह यांनी ‘टाइम्स ऑफ इस्त्रायल’ या वृत्तपत्राला दिलेल्या माहितीनुसार, या स्प्रेमुळे जगातील अनेकांचे प्राण वाचवणे शक्य आहे. परवडणा-या किंमतीत हा स्प्रे सहज उपलब्ध होईल. श्वसनावाटे होणा-या कोणत्याही संसर्गापासून बचाव करण्यासाठी याचा उपयोग होईल. रेगेव्ह यांनी ‘सॅनोटाईझ’ ही कंपनी स्थापन केली असून, कॅनडामध्ये या स्प्रेची निर्मिती केली आहे.

रेगेव्ह म्हणाल्या, प्रयोगशाळेत हा स्प्रे सर्व प्रकारच्या विषाणू विरोधात प्रभावशाली ठरला आहे. याचे ॲन्टीवायरल स्पेक्ट्रम सर्व प्रकारच्या विषाणूंचा खात्मा करतात. ‘एनोविड’ असं त्यांनी या स्प्रेला नाव दिले असून, नाकासाठी हा सॅनिटायझर सारखं काम करेल असे त्या म्हणाल्या.

नायट्रिक ऑक्साईडच्या मदतीने हा स्प्रे विषाणूंसाठी नाकात अडथळा निर्माण करतो. नायट्रिक ऑक्साईड त्याच्या प्रतिजैविक गुणांसाठी ओळखला जातो. त्यामुळे हा स्प्रे विषाणूंना अडथळा निर्माण करत नाही तर प्रत्यक्षात त्यांना ठार करतो, असं रेगेव्ह म्हणाल्या.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.