Corona Update : खूशखबर ! ‘डेक्सामेथासोन’ ठरलं कोरोनावरचे पहिले प्रभावी औषध

Good news! Dexamethasone became the first effective drug for coronavirus

एमपीसी न्यूज – ‘डेक्सामेथासोन’ हे औषध कोरोना विषाणूवर अत्यंत प्रभावी ठरल्याचे दिसून आले असून या औषधाचा वापर करुन करोनामुळे चिंताजनक प्रकृती असलेल्या रुग्णांचे प्राण वाचवता येणे शक्य आहे.

‘BBC’ ने दिलेल्या वृत्तानुसार, डेक्सामेथासोन या औषधामुळे मृत्यू दर कमी होत असल्याचे समोर आले आहे. डेक्सामेथासोनचा कमी प्रमाणात डोस देऊन गंभीर अवस्था असलेल्या तीन रुग्णांपैकी एकाचे प्राण वाचवता येतात.

‘यूके’मधील क्लिनिकल ट्रायलमध्ये हे औषध रुग्णांवर प्रभावी ठरलं आहे.

या औषधाच्या चाचणीतून समोर आलेले निष्कर्ष म्हणजे महत्वाचा शोध आहे, असे या अभ्यासात सहभागी असलेल्या वैज्ञानिकांनी म्हटलं आहे.

कोरोनामुळे रुग्णालयात उपचारांसाठी दाखल असलेल्या रुग्णांवर तात्काळ या औषधाचा वापर सुरु करावा, असं वैज्ञानिकांच मत आहे.

कोरोनामुळे व्हेंटिलेटर किंवा ऑक्सिजनवर असलेल्या रुग्णांना डेक्सामेथासोनचा डोस दिल्यानंतर ते रुग्ण बरे होत असल्याचे दिसले आहे.

ऑक्सफर्ड विद्यापीठाचे प्राध्यापक असलेले मार्टिन लँडरे म्हणाले की, हे औषध कमी खर्चिक आहे.गंभीर लक्षणे असलेल्या रुग्णांना या औषधामुळे वाचवले जाऊ शकते तसेच ज्यांना आरक्षणाची गरज आहे त्यांनासुद्धा या औषधामुळे फायदा झाल्याचे दिसून आले आहे.

ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटी मधील एका टीमने जवळजवळ दोन हजार रुग्णांना औषध देऊन एक प्रयोग केला होता.

त्या तुलनात्मक अभ्यासात असे दिसून आले की व्हेंटिलेटरवर असणाऱ्या लोकांमध्ये 40 ते 28 टक्के फरक पडल्याचे दिसून आले, तर ऑक्सिजनवर असलेल्या लोकांपैकी वीस ते पंचवीस टक्के लोकांची जोखीम कमी झाल्याचे निदर्शनास आले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.