EPFO : कर्मचाऱ्यांसाठी गुड न्यूज! खात्यात जमा PF वर मिळणार 8.15 टक्के दराने व्याज, EPFO ची घोषणा

एमपीसी न्यूज : कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेने (EPFO) मोठा निर्णय घेतला आहे. कर्मचारी भविष्य निर्वाह निधी (EPF) वरील व्याजात वाढ करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या निर्णयामुळे EPFO च्या खातेदारांना मोठा दिलासा मिळाला आहे. कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेने (EPFO) 8.15 टक्के दराने व्याज देण्याचा निर्णय घेतला आहे. गेल्या आर्थिक वर्षासाठी EPFO ​​कडून 8.10 टक्के दराने व्याज दिले जात होते. यंदाच्या पीएफच्या व्याज दरात कपात केली जाण्याची शक्यता वर्तवण्यात येत होती. 

कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेने 2022-23 या आर्थिक वर्षासाठी EPF खातेधारकांसाठी 8.15 टक्के व्याजदर देण्याचा निर्णय घेतला आहे.  या निर्णयाचा फायदा देशातील 6 कोटींहून अधिक ईपीएफ खातेधारकांना होणार असून त्यांच्या खात्यात अधिक पैसे जमा होतील. 2021-22 साठी, EPFO ​​ने व्याजदर 8.1 टक्क्यांपर्यंत कमी केला होता. हा व्याज दर गेल्या चार दशकांतील सर्वात खालच्या पातळीवर आला होता. 2020-21 या आर्थिक वर्षात तो 8.50 टक्के दराने व्याज दिले जात होते. यंदाच्या पीएफच्या व्याज दरात कपात केली जाण्याची शक्यता वर्तवण्यात येत होती.

Pimpri News : पिंपरी-चिंचवडमध्ये झळकले “आम्ही सारे सावरकर”चे फलक

गेल्या वर्षी म्हणजेच 2021-22 साठी हा व्याजदर 8.1 टक्के दराने होता. हा व्याजदर गेल्या 40 वर्षांतील सर्वात कमी असून सरकारच्या या निर्णयाला मोठा विरोध झाला होता. सेंट्रल बोर्ड ऑफ ट्रस्टीज (CBT) व्याज दर निश्चित करतात. अर्थ मंत्रालय हे निश्चित केलेले व्याज दर लागू करण्याबाबतचे आदेश जारी करतात.(EPFO)कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेची दोन दिवसीय बैठक 27 मार्चपासून सुरू झाली होती.  EPFO चे जवळपास 6 कोटी खातेदार आहेत. या कोट्यवधी कर्मचाऱ्यांचे 27.73 लाख कोटी रुपयांच्या निधीचे व्यवस्थापन EPFO च्या माध्यमातून केले जाते,

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.