Panshet Dam : पुणेकरांना आनंदाची बातमी; पानशेत धरण 100 टक्के भरले 

एमपीसी न्यूज – पानशेत धरण पूर्ण क्षमतेने म्हणजे 100 टक्के भरल्याने पुणेकरांची पाण्याची चिंता मिटेल.

पानशेत धरणाच्या सांडव्यावरून नदीपात्रामध्ये सुरू असणारा विसर्ग कमी करून सायंकाळी 4 वाजता वा.12 हजार 936 क्यूसेक्स करण्यात येत आहे,असे सहाय्यक अभियंता यो.स.भंडलकर यांनी सांगितले आहे.त्यामुळे मुठा नदी काठावरील गावांनी व पुणे शहरातील नागरिकांनी सतर्क रहावे.

पानशेत धरणाच्या सांडव्यावरून नदीपात्रामध्ये सुरू असणारा विसर्ग सकाळी 9.30 वाजता 12 हजार 936 क्यूसेक्स होता.तो पानशेत धरणातून सकाळी 10.15 वा.18 हजार 784 क्यूसेक्स करण्यात आला होता.

 

पावसाच्या प्रमाणानुसार व येव्यानूसार विसर्ग पुन्हा कमी/जास्त करण्याची शक्यता आहे. नागरिकांनी नदीपात्रात उतरू नये आणि योग्य ती खबरदारी घ्यावी, असेही त्यांनी सांगितले.

पानशेत धरण हे आंबी नदीवर बांधण्यात आले आहे. आंबी नदी ही मुठा नदीची उपनदी आहे. या दोन्ही नद्यांच्या काठावर लोकांनी सतर्क रहावे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.