Vadgaon Maval : चांगली माणसे, पुस्तकं आणि संधी आयुष्य बदलतात – शरद तांदळे

एमपीसी न्यूज – अनेक संधी आपल्याकडे चालून येतात. पण आपण त्याचा सुयोग्य वापर करत नाही. रोजगाराची संधी आहे. त्याकडे वाटचाल करा. चांगली माणसे, चांगली पुस्तके, चांगल्या संधी आयुष्य बदलून टाकतात असे प्रतिपादन व्याख्याते शरद तांदळे यांनी केले.

मावळ तालुक्याचे आमदार सुनील शेळके यांच्या मार्गदर्शनाने जिल्हा उदयोग केंद्र व मिटकॉन यांच्या संयुक्त विद्यमाने संतोषभाऊ जांभुळकर युवा मंच आयोजित स्वयंरोजगार मार्गदर्शन मेळावा वडगाव मावळ येथील शासकीय विश्रामगृह प्रांगणात संपन्न झाला. यावेळी शरद तांदळे बोलत होते.

कार्यक्रमाच्या सुरुवातीस मान्यवरांच्या शुभहस्ते छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करण्यात आले व दीपप्रज्वलन करण्यात आले आणि शिवन्या ग्रुपच्या मुलींनी शिववंदना सादर केली.

प्रसंगी व्यासपीठावर सहकारमहर्षी माऊली दाभाडे, मावळ तालुक्याचे आमदार सुनील शेळके, व्याख्याते शरद तांदळे, व्याख्याते गणेश खामगळ, जिल्हा उदयोग केंद्राचे व्यवस्थापक, नगराध्यक्ष मयूर ढोरे, संत तुकाराम सहकारी साखर कारखान्याचे माजी संचालक अंकुश आंबेकर, मावळ तालुका खरेदी विक्री संघांचे माजी चेअरमन पंढरीनाथ ढोरे, मावळ तालुका राष्ट्रवादी युवक अध्यक्ष सुनील दाभाडे, मावळ तालुका राष्ट्रवादी महिला अध्यक्षा सुवर्णा राऊत, राष्ट्रवादी काँग्रेस महिला आघाडी सरचिटणीस शशिकला सातकर,ग्रामपंचायत सदस्य तृप्ती जांभुळकर, राष्ट्रवादी काँग्रेस रायगड जिल्हा निरीक्षक रुपाली दाभाडे, लोकनियुक्त सरपंच विजय सातकर, माजी सरपंच प्रकाश आगळमे, माजी सरपंच. दत्तात्रय पडवळ, संजय गांधी निराधार योजना मावळचे अध्यक्ष नारायण ठाकर,कृषी उत्पन्न बाजार समितीचे विष्णु गायखे, उपनगराध्यक्षा शारदा ढोरे, मावळ तालुका युवक काँग्रेस अध्यक्ष विलास मालपोटे, माजी सरपंच चंद्रकांत दहिभाते, ग्रामपंचायत सदस्य बाबाजी चोपडे, ग्रामपंचायत सदस्य विक्रम कलावडे, माजी सरपंच गजानन खरमारे, बाळासाहेब खरमारे, माजी सरपंच मंगल मुऱ्हे आदी मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमप्रसंगी वडगाव नगरीच्या उपनगराध्यक्षा शारदा ढोरे यांचा विशेष सन्मान करण्यात आला.

स्वयंरोजगार मार्गदर्शन मेळाव्याचे मुख्य मार्गदर्शन व्याख्याते शरद तांदळे पुढे बोलताना म्हणाले महिला व युवकांना रोजगार संधी याबत अनेक संधी आपल्याकडे चालून येतात पण आपण त्याचा सुयोग्य वापर करत नाही. त्यासाठी आता पेटून उठा, रोजगाराची संधी आहे त्याकडे वाटचाल करा तसेच चांगली माणसे, चांगली वाचलेली पुस्तके, चांगल्या संधी आयुष्य बदलून टाकतात आता स्वतःला बदला असे सांगून आपल्या मार्गदर्शनाने शरद तांदळे सरांनी उपस्थित सर्वाना मंत्रमुग्ध केले व संतोषभाऊ जांभुळकर यांनी हा मेळावा आयोजित करून तरुणांना पुढील काळात त्याचा नक्कीच फायदा होईल असे सांगितले व मावळध्ये येऊन आपल्या भूमीमध्ये आलो आहे असे आवर्जून सांगितले.

स्वयंरोजगार मार्गदर्शन मेळाव्या प्रसंगी शुभेच्छा देताना सहकारमहर्षी माऊली दाभाडे म्हणाले की इथून पुढे युवकांनी व्यवसायात उतरले पाहिजे व निवडलेल्या व्यवसायात सातत्य ठेऊन कामं करायला पाहिजे असे सांगितले.

मावळचे आमदार सुनील शेळके यांनी संतोष जांभुळकर यांनी राबवलेल्या या स्वयंरोजगार मार्गदर्शन मेळाव्याचे कौतुक केले.प कारण असे मेळावे फार कमी प्रमाणात आयोजित होत असतात व आपल्या तालुक्यात पहिल्यांदाच असा मेळावा होत आहे यासाठी शुभेच्छा दिल्या, उपस्थित सर्वांनी या मेळाव्याचा जास्तीत जास्त उपयोग आपल्या व्यवसाय उभारणीसाठी करावा असे सांगितले.

मिटकॉन च्या वतीने गणेश खामगळ यांनी उद्योजकीय मानसिकता या विषयावर आपले मत मांडले व सांगितले की उद्योजक होण्यासाठी आपल्यातील नकारार्थी भावना बदलून होकारार्थी बना, म्हणजे आपली मानसिकता बदला व स्वतःला सिद्ध करा असे सांगितले.

संतोष जांभुळकर यांनी सांगितले की कोरोनाच्या काळामध्ये अनेक युवकांच्या नोकऱ्या गेल्या काही कंपन्या बंद पडल्या अक्षरशः बरेच जण बेरोजगार झाले, यातून सर्वाना सावरण्यासाठी योग्य दिशा, मार्गदर्शन मिळण्यासाठी ह्या स्वयंरोजगार मेळाव्याचे आयोजन केल्याचे सांगितले.

स्वयंमरोजगार मार्गदर्शन मेळावा कार्यक्रमाचे संपूर्ण सूत्रसंचालन प्रा. लक्ष्मण शेलार सर यांनी केले. कार्यक्रमप्रसंगी उपस्थित मान्यवरांचा परिचय प्रा. देविदास आडकर सर यांनी करून दिला तर उपस्थित सर्वांचे आभार भानुदास जांभुळकर यांनी मानले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.