Pune News : पुणेकरांसाठी मोठी बातमी! मिळकत करात 40 टक्के सवलतीचा निर्णय

एमपीसी न्यूज : पुणेकरांना मिळकत करात 40 टक्के सवलतीसह तीन पट शास्तीकर रद्द करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. (Pune News) त्यामुळे पुणेकरांना मोठा दिलासा मिळाला आहे. आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली महत्वाची बैठक पार पडली. यावेळी हा मोठा निर्णय घेण्यात आला. तसेच येणाऱ्या कॅबिनेटच्या बैठकीत याबाबतचा प्रस्ताव आणून याला मान्यता देण्यात येणार असल्याचं सांगण्यात आलं आहे.

 

पुणे महानगरपालिकेमार्फत मुख्य सभेने 3 एप्रिल 1970 मध्ये मिळकत कराची आकारणी करताना घरमालक स्वतः राहात असलेल्या जागेचे भाडे वाजवी भाड्याच्या 60 टक्के इतके धरून 40 टक्के सवलत तसेच सर्व मिळकतींना करपात्र रक्कम ठरविताना 10 टक्क्यांऐवजी 15 टक्के सवलत देण्याचा निर्णय घेतला होता.(Pune News) महापालिकेच्या झालेल्या सन 2010-12 च्या लेखापरीक्षणामध्ये दहा टक्क्यांऐवजी पंधरा टक्के सवलत देण्याबाबत आक्षेप नोंदविण्यात आला होता. तसेच त्यावर लोकलेखा समितीच्या बैठकीमध्ये चर्चा होऊन त्यानुसार प्राप्त आदेशानुसार शासनाने 1 ऑगस्ट 2019 च्या निर्णयानुसार ठरावाचे विखंडन केले होते. ठराव विखंडित झाल्यामुळे कर आकारणी आणि कर संकलन कार्यालयाने शहरातील ज्या मिळकत धारकांना 40 टक्के सवलत देण्यात आलेली आहे, अशा मिळकतींची सवलत 1 ऑगस्ट 2019 पासून रद्द करून फरकाची देयके पाठविली आहेत.

 

Talegaon Dabhade : तळेगाव दाभाडे येथे निवृत्त नर्सची गळफास घेऊन आत्महत्या

 

सवलतीची वसुली पूर्वलक्ष्यी प्रभावाने वसुली होणार असल्याने त्याचा 90 हजार मिळकतधारकांना फटका बसला आहे. मिळकतकराची सवलत रद्द करण्यावरून राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेससह अन्य पक्षांनी विधिमंडळाच्या अधिवेशनात हा मुद्दा उपस्थित केला होता.

 

पुणेकरांना मिळकत करात सवलत मिळावी, यासाठी पुण्यातील भाजपच्या शिष्टमंडळाने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली होती. (Pune News) तसेच पुणे महानगरपालिका हद्दीत मिळकत करात पुणेकरांना देण्यात येणारी 40 टक्के सवलत कायम ठेवावी, अशी मागणी या शिष्टमंडळाने केली होती. त्यावेळी यासंदर्भात बैठक घेण्याचे आश्वासन मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी दिले होते. त्यानुसार मुंबईत शुक्रवारी (17 मार्च) ही बैठक घेण्यात आली. या बेठकीत मिळकत करात 40 टक्के सवलतीचा निर्णय कायम ठेवण्यात आला असून या निर्णयामुळे पुणेकरांना मोठा दिलासा मिळाला आहे.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.