Lonavala : खंडाळा घाटात मालगाडीचा डबा घसरला

एमपीसी न्यूज- पुणे- मुंबई लोहमार्गावर खंडाळा बोगद्यात मालगाडीचा डबा घसरल्य‍ाची घटना आज पहाटे पावणे पाच वाजण्याच्या सुमारास घडली. डाऊन मार्गावर घडलेल्या या अपघाताचा मात्र रेल्वे वाहतुकीवर कसलाही परिणाम झालेला नाही.

मिळालेल्या माहितीनुसार पहाटे पावणेपाच वाजण्याच्या सुमारास मुंबईकडून पुण्याच्या दिशेने घाट चढून येणार्‍या मालगाडीचा डब्बा खंडाळा बोगद्यात घसरला.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.