Google Meet: आता ‘जीमेल’ वरुन एकाच वेळी 100 जणांना करा Free व्हिडिओ कॉल !

Google Meet: Now add up to 100 people on video calls from Gmail at once!

एमपीसी न्यूज – गुगलने Gmail मध्ये नवीन फीचर आणलं असून यामुळे  व्हिडिओ कॉन्फरन्सिंग अ‍ॅप Google Meet आता जीमेलद्वारे मोफत वापरता येणार आहे. गेल्या महिन्यात कंपनीने Google Meet सर्व युजर्ससाठी मोफत उपलब्ध करण्याची घोषणा केली होती. त्यानंतर जीमेलद्वारेच Google Meet चा वापर करता येणारे एक नवीन फीचर कंपनीने रोलआउट करण्यास सुरुवात केली. आता हे फीचर सर्व युजर्सच्या जीमेल अकाउंटमध्ये उपलब्ध झाल्याची माहिती गुगलकडून देण्यात आली आहे.

करोनाच्या वाढत्या प्रसारामुळे सध्या घरबसल्या व्हिडिओ कॉलिंग फीचर असलेल्या अ‍ॅप्सचा वापर मोठ्या प्रमाणात वाढलाय. मात्र यातील काही अॅप ही चिनी असल्याने त्यांच्या वापराविषयी खूप उलटसुलट चर्चा होत्या. ती सेफ नाहीत, डाटा चोरला जातो हा त्याविषयी मुख्य आक्षेप घेण्यात येत होता. हे ओळखून कंपनीने गेल्या महिन्यात Google Meet सर्व युजर्ससाठी मोफत उपलब्ध केलं.

आतापर्यंत हे अ‍ॅप केवळ G Suite च्या ग्राहकांना तेही केवळ व्यावसायिक आणि शैक्षणिक उपक्रमांसाठी उपलब्ध होते. त्यासाठीही पैसे आकारले जायचे. पण, आता हे अ‍ॅप जीमेलद्वारे सर्वांना मोफत वापरता येणार असून याद्वारे एकाच वेळी 100 जणांना व्हिडिओ कॉल करता येणार आहेत.

आता कोणालाही व्हिडिओ कॉल करण्यासाठी वेगळं Google Meet अ‍ॅप ओपन करायची गरज नाही. तुम्ही जीमेलद्वारेच व्हिडिओ कॉल करु शकाल. यासाठी GMail अकाउंट ओपन केल्यानंतर डाव्या बाजूला हँगआउट्स चॅटच्या वरती ‘Meet’ हा नवा पर्याय मिळेल. यावर क्लिक करुन युजर त्यांच्या गरजेनुसार Join a meeting किंवा Start a meeting हा पर्याय निवडू शकता.

ज्या युजर्सच्या जीमेलमध्ये डाव्या बाजूला  ‘Meet’ हा नवा पर्याय उपलब्ध नसेल. त्यांनी उजव्या बाजूला असलेल्या जीमेल अ‍ॅप्स पर्यायवर क्लिक केल्यास तिथे हा पर्याय दिसेल.  वेब अ‍ॅक्सेसव्यतिरिक्त iOS युजर्स आणि अँड्रॉइड या दोन्ही युजर्ससाठी हे अ‍ॅप मोफत उपलब्ध असेल असे कंपनीने स्पष्ट केले आहे. अ‍ॅप स्टोअर आणि प्ले स्टोअरमधून Google Meet डाउनलोड करता येईल. Google Meet चा वापर करण्यासाठी युजरचं गुगल अकाउंट असणं गरजेचं आहे.

पण, ही मोफत सेवा केवळ 30 सप्टेंबरपर्यंतच असेल. त्यानंतर मिटिंगची वेळमर्यादा 60 मिनिटांपर्यंत सेट केली जाईल. Google Meet च्या प्रीमियम व्हर्जनमध्ये  250 युजर्स दर्शक म्हणून सहभागी होऊ शकतात. मात्र फ्री सर्व्हिसमध्ये कंपनीकडून ही मर्यादा 100 ठेवण्यात आली आहे. G Suite Essentials मध्ये मिळणारे डायल-इन फोन नंबर, मिटिंग रेकॉर्डिंगसारखे सर्व फीचर्स युजर्ससाठी मोफत असणार आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.