#GoogleDown : गुगल झाले डाऊन; मिम्सचा पडला पाऊस

एमपीसी न्यूज : नेटकऱ्यांचे लोकप्रिय तसेच महत्त्वाचे सर्च इंजिन Google हे (#GoogleDown) भारतीय वेळेनुसार आज सकाळी 7 वाजता डाऊन झाले. केवळ 10 मिनिटांसाठी हे सर्च इंजिन डाऊन झाले असले, तरी यावर अनेकांची कामे अवलंबून असल्याने नेटकरी वैतागले. त्यावेळेत वापरकर्त्यांना समस्यांना सामोरे जावे लागले. परंतु, गुगल डाऊन कशामुळे झाले हे अद्याप समजले नाही.

गुगल भारतीय वेळेनुसार सकाळी 7 वाजता डाऊन झाले असले, तरी इतर देशात त्यावेळेत इतरांचे ऑफिस वर्क सुरु असते. म्हणून जगभरात अनेकांना समस्यांना तोंड द्यावे लागले. परंतु, जेव्हा गुगल पूर्ववत झाले, त्यावेळी मात्र नेटकऱ्यांच्या मिम्सचा पाऊस पडला.

एका नेटकऱ्याने मिम शेअर करत म्हंटले आहे, कि गुगल डाऊन झाल्याने मी गुगल स्विच करून ट्विटरमध्ये जात आहे.

दुसरा नेटकरी म्हणत आहे, कि मी स्वतः google सर्व्हर ठीक करण्याचा प्रयत्न करत आहे #googledown

आपण सर्वजण google बंद असल्याची पुष्टी करण्यासाठी twitter वर येत आहोत

Lavasa Hill Station : लवासा हिल स्टेशन बेकायदा? शरद पवार, अजित पवार आणि सुप्रिया सुळे यांना नोटीस

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.