Google Doodle : गुगलचे खास डुडल ; कोरोनापासून बचावासाठी दिल्या महत्वाच्या टिप्स

एमपीसी न्यूज – वाढत्या कोरोना रुग्णांच्या पार्श्वभूमीवर गुगलने खास डुडल बनवत खबरदारीच्या काही टिप्स दिल्या आहेत. डुडलवरील सर्व इंग्रजी लेटर्सला मास्क घातले असून, मास्क परिधान करणे, लस घेणे व जीव वाचविण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

कोरोना संसर्गाने पुन्हा वेग घेतला आहे. देशात झपाट्याने रूग्ण वाढत आहेत. त्यामुळे कायम मास्क परिधान करणे आणि पात्र असलेल्या सर्वांनी जवळच्या लसीकरण केंद्रावर जाऊन लस घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे. डुडल ओपन केल्यानंतर एक पेज उघडते त्यामध्ये जवळच्या लसीकरण केंद्राची माहिती देण्यात आली आहे. एवढेच नव्हे तर cowin.gov.in या संकेस्थळावर नोंदणी करण्यासाठी लिंक देण्यात आली आहे.

दरम्यान, गेल्या 24 तासांत देशभरात 2 लाख 58 हजार 089 नव्या कोरोना बाधित रुग्णांची नोंद झाली असून, 1 लाख 51 हजार 740 जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. देशातील दैनंदिन पॉझिटिव्हीटी रेट वाढून 19.65 टक्क्यांवर पोहोचला आहे. सध्याच्या घडीला देशात 16 लाख 56 हजार 341 ॲक्टिव्ह कोरोना रुग्णांवर उपचार सुरू आहेत. भारतात कोरोना प्रतिबंधात्मक लसीकरण मोहिम अंतर्गत आजवर 157.20 कोटी नागरिकांचे लसीकरण झाले आहे.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.