Punavale : कुख्यात गुंड महाकालीच्या भावाचा खून

goon Mahakali's brother murdered in Punavale late last night

एमपीसी न्यूज – पिंपरी चिंचवड शहरातील कुख्यात गुंड महाकालीचा भाऊ डिंगऱ्या याचा खून झाला आहे. डोक्यात लाकडी दांडक्याने मारून त्याचा खून करण्यात आला आहे. ही घटना रविवारी (दि. 17) रात्री पुनावळे येथील लंडन ब्रिजखाली घडली आहे.

मनोज उर्फ डिंगऱ्या फुलचंद ढकोलिया (वय 35, रा. रमाबाई नगर, रावेत) असे खून झालेल्याचे नाव आहे. डिंगऱ्या हा देखील सराईत गुंड असून त्याने महाकालीचे एन्काऊंटरनंतर गँग चालविण्याचा अपयशी प्रयत्न केला होता. डिंगऱ्या याच्यावर नऊ गुन्हे दाखल असून पोलिसांनी त्याला तडीपार केले होते. तडीपारीच्या आदेशाचे उल्लंघन करून तो शहरात आला होता.

आदम उर्फ गोट्या महंमद खान (वय 32, रा. पुनावळे) याला गुन्हे शाखेच्या पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

डिंगऱ्या आणि आदम हे दोघे रविवारी रात्री दारू पिण्यासाठी लंडन ब्रिजखाली बसले होते. दारू पिताना दोघांमध्ये वाद झाला. त्यातून आदम याने डिंगऱ्याला लाकडी दांडक्याने डोक्यात मारले आणि आदम पळून गेला. पोलिसांना माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले.

डिंगऱ्या गंभीर जखमी अवस्थेत पुलाखाली पडला होता. पोलिसांनी डिंगऱ्याला तात्काळ उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले. मात्र, त्याचा उपचारापूर्वीच मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी घोषित केले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.