Pimpri : गोरडे परिवारातर्फे मातृसेवा सेवाभावी वृद्धाश्रमाला धान्याची मदत

एमपीसी न्यूज – आजीच्या प्रथम पुण्यस्मरणानिमित्त अॅड संकेत गोरडे आणि परिवारातर्फे मातृसेवा सेवाभावी वृद्धाश्रमाला धान्य स्वरुपात मदत देण्यात आली. वृद्धाश्रमाच्या वतीने व्यवस्थापिका संस्कृती गोडसे यांनी भेट स्वीकारली.

_MPC_DIR_MPU_II

संकेत गोरडे यांना वडील नसून आई, आजी आजोबांनीच त्यांचा सांभाळ केला. त्यामुळे आजीच्या प्रथम पुण्यस्मरणानिमित्त वृद्धाश्रमाला धान्य देऊन मदत करण्याचा विचार त्यांच्या मनात आला. हा विचार त्यांनी आपल्या आजोबांना आणि भावाला सांगितला असता त्यांनी सहमती दर्शविली. संस्कृती गोडसे यांनी यावेळी संकेत गोडसे आणि परिवाराला धन्यवाद देऊन संकेत गोरडे यांच्या उत्तम विचारांचे कौतुक केले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.