BNR-HDR-TOP-Mobile

Pimpri: पाच लाख बालकांना गोवर-रुबेला प्रतिबंधक लस

वैद्यकीय संचालक डॉ. पवन साळवे यांची माहिती

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड शहरातील सुमारे पाच लाख एक हजार 810 बालकांनी आजअखेरपर्यंत गोवर-रुबेला प्रतिबंधक लसीकरणाचा लाभ घेतला. या मोहिमेमध्ये सहा लाख 16 हजार 193 बालकांना लस देण्याचे लस देण्याचे उदिष्ट निश्चित करण्यात आले आहे. याबाबतची माहिती वैद्यकीय संचालक डॉ. पवन साळवे यांनी दिली.

पिंपरी-चिंचवड महापालिकेतर्फे 27 नोव्हेंबर 2018 पासून गोवर-रुबेला प्रतिबंधक लसीकरण मोहीम शहरामध्ये राबविण्यात येत आहे. या मोहीमेंतर्गत पिंपरी-चिंचवड शहरातील नऊ महिने ते पंधरा वर्षे वयोगटातील बालकांना लसीकरण करण्यात येत आहे. या लसीकरणासाठी महापालिका आणि खासगी शाळा, तसेच अंगणवाडी, बालवाडी आणि नर्सरीमध्ये 2807 ठिकाणी लसीकरण मोहिम सुरु आहे.

लसीकरण सत्रांचे 28 जानेवारीपर्यंत आयोजन
याअंतर्गत शहरातील पाच लाख एक हजार 810 बालकांना या गोवर-रुबेला प्रतिबंधक लस देण्यात आली. 28 जानेवारीपर्यंत महापालिकेच्या दवाखाने, रुग्णालयांमध्ये लसीकरण सत्रांचे आयोजन करण्यात आले आहे. या लसीकरण मोहीमेसाठी सर्व वैद्यकीय अधिकारी, एएनएम, आरोग्य कर्मचारी, महापालिका व खासगी शाळेतील शिक्षक, तसेच स्वयंसेवी संस्थांचे सहकार्य लाभले, असे वैद्यकीय संचालक डॉ. पवन साळवे यांनी सांगितले.

HB_POST_END_FTR-A2

HB_POST_END_FTR-A3