Income Tax Return Filing Date: पॅन-आधार कार्ड लिंक करणे आणि इन्कम टॅक्स रिटर्न भरण्याच्या मुदतीत वाढ

Government Extends Deadline For Filing This Year's I-T Returns Till 30 November also extended pan card aadhar card link date आता आधार आणि पॅन कार्ड 31 मार्च 2021 पर्यंत लिंक करता येणार आहे. यापूर्वी आधार-पॅन लिंक करण्याची मुदत 30 जून 2020 होती.

एमपीसी न्यूज- कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव आणि लॉकडाऊनमुळे सरकारने आधार कार्डला पॅन कार्ड लिंक करण्याची मुदत पुन्हा वाढवली आहे. आता आधार आणि पॅन कार्ड 31 मार्च 2021 पर्यंत लिंक करता येणार आहे. यापूर्वी आधार-पॅन लिंक करण्याची मुदत 30 जून 2020 होती. त्याचबरोबर करदात्यांनाही मोठा दिलासा देण्यात आला आहे. प्रत्यक्ष कर, बेनामी संपत्ती कायद्याबाबत कालमर्यादा वाढवण्यात आली आहे. आर्थिक वर्ष 2018-19 साठी मूळ किंवा सुधारित प्राप्तिकर विवरण पत्र दाखल करण्याची मुदत वाढवून 31 जुलै 2020 पर्यंत करण्यात आली आहे.

आर्थिक वर्ष 2019-20 साठी कर विवरण पत्र दाखल करण्याची मुदत वाढवून 30 नोव्हेंबर 2020 करण्यात आली आहे. याचाच अर्थ जे विवरण पत्र 31 जुलै आणि 31 ऑक्टोबर 2020 दाखल करायचे होते. ते आता 30 नोव्हेंबरपर्यंत दाखल करता येतील.

_MPC_DIR_MPU_II


केंद्र सरकारने या कामांसाठी एक महिन्याचा अधिकचा कालावधी दिला आहे. ही माहिती केंद्रीय प्रत्यक्ष कर मंडळाने (सीबीडीटी) दिली आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.