Government Job Fraud : सरकारी नोकरी लावण्याच्या आमिषाने दीड लाखाची फसवणूक

एमपीसी न्यूज – मंत्रालयात कामाला (Government Job Fraud) असून तुम्हाला भूसंपादन खात्यात नोकरी लावतो, असा बहाणा करून एकाची दीड लाख रुपयांची फसवणूक केली. हा प्रकार जुलै 2020 ते 27 सप्टेंबर 2022 या कालावधीत चिखली आणि वाकड येथे घडला.

अभिजित सोमनाथ शिंदे (वय 31, रा. नेवाळे वस्ती, चिखली) यांनी याप्रकरणी चिखली पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार अमोल शहाजी पाटील (रा. उस्मानाबाद) याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Pawana River : कासारवाडी जवळ पवना नदीत एका पुरुषाचा सापडला मृतदेह

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपीने फिर्यादींना तो मंत्रालयात कामाला आहे, फिर्यादीस भूसंपादन खात्यात नोकरी लावतो, असे सांगितले. नोकरी लावण्यासाठी फिर्यादींचा विश्वास संपादन करून त्यांच्याकडून वेळोवेळी दीड लाख रुपये घेतले. पैसे घेऊन फिर्यादीस नोकरी न लावता (Government Job Fraud) त्यांची फसवणूक केली. चिखली पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.