Pimpri : ‘अच्छे दिन’च्या नादात सरकारचा नागरिकांच्या जिवाशी खेळ – राहुल कलाटे

जीएसटीमुळे औषधांचा तुटवडा निर्माण झाल्याचे प्रकरण 

एमपीसी न्यूज – भाजप सरकारने अच्छे दिन आणण्यासाठी वस्तू व सेवा कर (जीएसटी) लागू केला. या जीएसटी करावरून महापालिका व ठेकेदार यांच्या वादामुळे  महापालिकेच्या यशवंतराव चव्हाण स्मृती (वायसीएम) रुग्णालयात औषधांचा तुटवडा निर्माण झाला आहे. आता 25 टक्केच साठा शिल्लक राहिला आहे. या प्रकारावरून ‘अच्छे दिन’च्या नादात भाजप सरकार आता नागरिकांच्या जिवाशी खेळत आहे, अशी टीका शिवसेना गटनेते राहुल कलाटे यांनी केली आहे. 

राहुल कलाटे यांनी प्रसिद्धीस दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, महापालिकेच्या वायसीएम रुग्णालयात शहर व ग्रामीण भागातून गोर-गरीब रुग्ण उपचारासाठी येतात. अनेकांची परिस्थिती हालाखीची असते. खासगी रुग्णालयात खर्च परवडणारा नसतो. त्यामुळे ते वायसीएमला आपला आधार समजतात. परंतु, जीएसटी करप्रणालीमुळे महापालिकेच्या वायसीएम रुग्णालयात औषधांचा तुटवडा निर्माण झाला आहे. सध्या रुग्णालयात 25 टक्केच साठा शिल्लक राहिला आहे. 

ठेकेदार व प्रशासन यांच्यात जीएसटी कर कोणी भरायचा या वादातून हा सगळा प्रकार सुरू आहे. ही बाब गंभीर असून ‘अच्छे दिन’ आणण्याच्या वल्गना करणारे  भाजप सरकार आणि सत्ताधारी नागरिकांच्या जिवाशी खेळत आहेत, असे राहूल कलाटे यांनी म्हटले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.