Pimpri News : शासनाने हिंदू समाजाच्या सहनशक्तीची परीक्षा बघणे बंद करावे – शंकर गायकर

एमपीसी न्यूज – सांगली जिल्ह्यात जत तालुक्यातील लवंगा उमदी येथे 4 साधूंना मॉब लीन्चींग करून अतिशय निर्घृणपणे मारहाण करण्यात आली आहे.साधूंना मारहाण करणाऱ्या आरोपींना कठोर शासन करावे,अशी मागणी करतानाच शासनाने हिंदू समाजाच्या सहनशक्तीची परीक्षा बघणे बंद करावे, असा इशारा विश्व हिंदू परिषदेचे मुंबई क्षेत्र मंत्री शंकर गायकर यांनी दिला आहे.

प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे की, कायदा हातात घेणारा हा जमाव कोण होता.या हिंदुत्वविरोधी विचारांनी पछाडलेल्या गावगुंडांच्या जमावाला शंका आली. तर, यांनी त्या साधुंना पोलिसांच्या ताब्यात का दिले नाही. असे अनेक प्रश्न यानिमित्ताने निर्माण होतात.ही घटना पालघर साधू हत्याकांडाशी साधर्म्य दर्शविणारी आहे.चोर पळविणारी टोळी ही फक्त हिंदू साधूंमध्येच कशी दिसते?  या घटनेचा व अशा सर्व षडयंत्रांचा विश्व हिंदू परिषद तीव्र शब्दात निषेध करते.

PCMC News : वैद्यकीय सेवेतील दर वाढीनंतर रुग्णालयातील भरणा वाढला

शासनाने वेळीच लक्ष घालून हे सर्व थांबवावे.हिंदू समाजाच्या सहनशक्तीची अजून परीक्षा बघणे बंद करावे. हिंदू समाज सहिष्णू आहे. परंतु, तो पुरुषार्थ विसरलेला नाही.संविधान व कायदा पाळणारा समाज अन्याय सहन करत नसतो याचे भान शासन व प्रशासनाने ठेवावे ही अपेक्षाही विश्व हिंदू परिषद व्यक्त करते.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.