Talegaon News : ‘परदेशात कलाकारांची काळजी सरकार घेते’ – मंदार पुरंदरे

एमपीसी न्यूज – धातुशास्त्रातील डिप्लोमा असलेले आणि जर्मन भाषेवर प्रभुत्व असलेले मंदार पुरंदरे पोलंडमधील पोझनान शहरात वास्तव्याला आहेत. त्यांनी जर्मन भाषेतील नाटकांचा भरपूर अभ्यास केला आणि हिंदी भाषा पारंगत असल्यामुळे सध्या ते पोलंडच्या विद्यापीठात हिंदी शिकवतात. हिंदी,जर्मनी आणि पोलिश भाषेवरील असलेल्या प्रभुत्वामुळे त्यांचे अनेक लेख प्रसिद्ध झाले आहेत. सर्व प्रकारची वाद्ये वाजविण्यात ते निष्णांत आहेत.

मागच्या आठवड्यात तळेगावातील महाराष्ट्र साहित्य परिषद आणि साप्ताहिक अंबरच्या माध्यमातून तळेगावातील नाट्यकर्मिंसाठी ‘पोलंडमधील नाट्यचळवळ’ या विषयावर व्याख्यान आयोजित केले होते.

मंदार पुरंदरेंनी पोलंडची मुळ नाट्य संस्कृती त्यावर विविध आक्रमणकर्त्यांमुळे पडत गेलेला खिस्ती धर्माचा प्रभाव आणि काही कालखंडानंतर परंतू मुळ नाट्य संस्कृतीचा प्रभाव,पोलंडमधल्या नाट्यगृहांचे विविध प्रकार त्यात कालानुरूप झालेल्या बदल यावर खूप छान भाष्य केले.पण तिथल्या नाटकांना 250 ते 300 प्रेक्षक असल्याचे पण सांगितले आणि नाटकांची तिकिटे आपल्याकडील 900 ते 1200 रुपये इतके असते असेही सांगितले.

तिकडचा रंगमंच सर्व आधुनिक सोयींनी युक्त असतो. पार्श्वसंगीताचा वापर पण मोठ्या प्रमाणात असतो. महत्वाचे म्हणजे तिकडच्या सर्व रंगकर्मींची काळजी सरकारच्यावतीने घेतली जाते त्यांना सरकारकडून नियमित आणि पुरेशी पेन्शन मिळत असते.तिथे कलेला राजमान्यता आहे. तिथेही विद्रोही चळवळ आहे त्यांची नाटके पण चालतात त्यांना ती नाटके सदर करताना कुठलाही अडथळा येत नाही, अशीही माहिती सांगितली.

आपल्याकडे पण कलेला राजाश्रय आहे पण सगळ्या राज्यामध्ये नाही. आपल्या कडची रंगभूमी साधनांची कमतरता असूनही अधिक प्रयोगशील आहे, त्यामुळे समृद्धही आहे. कलाकारांना मिळणारी पेन्शन तुटपुंजी आहे..पण नाटकाची आस जास्त आहे. आपल्या कडची हौशी नाट्यचळवळ पुर्ण जगामध्ये अद्वितीय आहे असे त्यांच्या व्याख्यानानंतर प्रकर्षाने जाणवले.

अखिल भारतीय मराठी नाट्यपरिषद तळेगाव दाभाडे शाखेच्यावतीने शाखेचे अध्यक्ष मा.सुरेशराव धोत्रे आणि विश्वस्त आणि सा.अंबरचे संपादक मा.सुरेशजी साखवळकर यांच्या हस्ते मंदार पुरंदरे यांचा गौरव करण्यात आला. मंदार पुरंदरे हे तळेगावातील म.सा.प.चे अध्यक्ष व सिद्धहस्त लेखक श्रीकृष्ण पुरंदरे यांचे चिरंजीव.

या कार्यक्रमासाठी तळेगावचे रंगकर्मी विश्वास देशपांडे,संजीव महाजनी,नाट्य अभ्यासक चेतन पंडित आणि ललित कला केंद्र पुणे यांचे विद्यार्थी व तळेगावचे नाट्य रसिक उपस्थित होते.

कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी वानप्रस्थाश्रमाच्या उर्मिलाताई छाजेड आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी परिश्रम घेतले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.