Maharashtra Political Crises : राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांना रुग्णालयातून डिस्चार्ज

महाराष्टातील राजकीय पेच सुटणार?

एमपीसी न्यूज – राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांना कोरोनाची लागण झाल्यामुळे त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते, परंतु आज त्यांना उपचारानंतर डिस्चार्ज देण्यात आला आहे. कोश्यारी यांनी डिस्चार्ज नंतर थेट राज भवन गाठले आहे, त्यामुळे काही दिवसांपासून राज्याला वेठीस धरणाऱ्या बंडखोरीवर (Maharashtra Political Crises) राज्यपाल काय पाऊल उचलणार हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

महाराष्टात गेल्या अनेक दिवसांपासून सत्ताकारणाची (Maharashtra Political Crises) सूत्रे वेगाने बदलत आहेत. बंडखोर शिवसेना आमदारांनी सुरूवातील सूरत आणि त्यानंतर गुवाहटी या ठिकाणी जात संख्याबळाच्या जोरावर राज्य सरकारलाच वेठीस ठरले आहे, त्यामुळे राज्याचे कामकाज पुरते कोलमडून पडले आहे. आमदारांच्या बंडखोरीमुळे राज्यातील शिवसैनिक पुन्हा अॅक्शन मोड मध्ये आला असून आमदारांची घरे, कार्यालय यांना लक्ष करत तोडफोड सत्र सुरू केले आहे. राज्यात अनेक ठिकाणी राज्यात मोर्चे, शक्तीप्रदर्शन यामुळे पुन्हा एकदा राज्यातील कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे, त्यामुळे 10 जुलै पर्यंत मुंबईत कलम 144 लागू करण्यात आले आहे.

Vijay Gupta : पक्षात बंडखोरी करणाऱ्यांना शिवसैनिक कधीही माफ करणार नाही – विजय गुप्ता

दरम्यान, राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांना आज रुग्णालयातून डिस्चार्ज मिळाला आहे. डिस्चार्ज मिळताच राज्यपाल कोश्यारी यांनी थेट राजभवन गाठले आहे. राजकीय घडामोडींच्या पार्श्वभूमीवर राज्यपाल राजभवनात परतल्यामुळे महाराष्टातील हा राजकीय पेच सुटणार की आणखी वाढणार असा प्रश्न आ वासून उभा राहिला आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.