Governor bhagat singh koshyari : तब्येत अगदी ठणठणीत; स्व-विलगीकरणात नाही

In good health; Not in self-isolation प्रकृतीसंदर्भात काही बातम्या निराधार

एमपीसी न्यूज – आपल्या प्रकृतीसंदर्भात प्रसार माध्यमांत काही ठिकाणी प्रसिद्ध झालेले वृत्त निराधार असल्याचे महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी स्पष्ट केले आहे.

आपण आवश्यक चाचण्या केल्या आहेत. त्याचे परिणाम देखील नकारात्मक आलेत. कोरोनाची लक्षणे देखील आपल्यात दिसून आली नाहीत. मात्र, इतरत्र असलेली परिस्थिती पाहून आपण कार्यालयीन कर्तव्ये बजावताना मुखपट्टीचा वापर, सुरक्षित सामाजिक अंतर ठेवणे, आदी आवश्यक ती खबरदारी घेत आहोत.

आपल्या प्रकृतीसंदर्भात काही ठिकाणी येत असलेले वृत्त निराधार आहे. आपली तब्येत चांगली आहे, असे राज्यपालांनी जारी केलेल्या प्रसिद्धीपत्रकात स्पष्ट केले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.