Maharshi Karve : राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांची महर्षी कर्वे स्त्री शिक्षण संस्थेला भेट

एमपीसी न्यूज – राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी आज महर्षी कर्वे (Maharshi Karve) स्त्री शिक्षण संस्थेला भेट दिली. त्यांनी भारतरत्न महर्षी कर्वे यांच्या समाधी स्थळाला अभिवादन केले आणि महर्षी कर्वे स्मारकालाही भेट दिली.

राज्यपाल कोश्यारी यांनी संस्थेच्या परिसराची पाहणी करताना प्रथम संस्थेतील वास्तुरचना महाविद्यालय, ‘कमवा व शिका’ योजनेअंतर्गत चालविली जात असलेली संपदा बेकरी आणि संस्थेची प्रथम वास्तू असलेली ‘कर्वे यांची झोपडी’ या ठिकाणी भेट देऊन माहिती जाणून घेतली. त्यांनी कर्वे शिक्षण संस्था परिसराची पाहणी करून समाधान व्यक्त करून संस्थेच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

SSC-HSC 2023 : दहावी – बारावीच्या बोर्ड परिक्षांच्या संभाव्य तारखा जाहीर

यावेळी संस्थेच्या अध्यक्षा स्मिता घैसास, उपाध्यक्ष सागर ढोले पाटील, कार्याध्यक्ष रवींद्र देव, उपकार्याध्यक्षा विद्या कुलकर्णी, आजन्म सेवक मंडळाच्या अध्यक्षा डॉ. माधुरी खांबेटे (Maharshi Karve) उपस्थित होते.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.