Graduate constituency Result : महाविकास आघाडीच्या विजयाचा पिंपरीत जल्लोष

एमपीसी न्यूज – विधानपरिषद निवडणुकीत भाजपचा धुव्वा उडवत महाविकास आघाडीने घवघवीत यश मिळविले आहे. पुणे पदवीधर, शिक्षक, औरंगाबाद आणि नागपूर पदवीधरमधून महाविकास आघाडीचे उमेदवार विजयी झाले आहेत. त्यानिमित्त पिंपरी-चिंचवड शहरातील महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांनी पिंपरीत जल्लोष केला.

पिंपरीतील डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा चौकात झालेल्या जल्लोषात राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष संजोग वाघेरे, शिवसेना जिल्हाप्रमुख गजानन चिंचवडे, पालिकेतील विरोधी पक्षनेते राजू मिसाळ, शिवसेना गटनेते राहुल कलाटे, माजी महापौर मंगला कदम, वैशाली घोडेकर, नगरसेवक अमित गावडे, राष्ट्रवादीच्या महिला शहराध्यक्ष वैशाली काळभोर, प्रज्ञा खानोलकर, शिवसेना महिला संघटिका उर्मिला काळभोर, सुलभा उबाळे, प्रशांत शितोळे, अनंत को-हाळे, विजय लोखंडे, वर्षा जगताप, मनिषा गटकळ, गंगा धेंडे आदी कार्यकर्ते सहभागी झाले होते.

यावेळी उपस्थित महिला पदाधिकाऱ्यांनी फुगडी खेळून आनंदोत्सव साजरा केला.

महाविकास आघाडीकडून लढलेले अरुण लाड पुणे पदवीधरमधून, तर शिक्षक मतदारसंघातून प्रा. जयंत आसगावकर, नागपूर पदवीधर मतदार संघातून काँग्रेसचे अभिजित वंजारी यांचा विजय झाला आहे.

औरंगाबाद पदवीधर मतदारसंघातून सलग दोन वेळा विजयी ठरलेले राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार सतीश चव्हाण यांनी विजयाची हॅटट्रिक साधली आहे.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.