Gram Panchayat Election Result : साताऱ्यातल्या उंब्रजमध्ये १४ पैकी १३ जागा भाजपकडे

हिवरे बाजारात पोपट राव पवार यांचे विजय 

एमपीसी न्यूज : साताऱ्यात आतापर्यंत राष्ट्रवादी काँग्रेस आणि भाजपचे वर्चस्व यला मिळाले आहे. साताऱ्यातल्या उंब्रजमध्ये १४ पैकी १३ जागा भाजपच्या बाळासाहेब पाटील गटाला मिळाल्या आहेत.

अहमदनगरच्या मठ पिंपरी ग्रामपंचायतीत पहिल्या ३ जागा राष्ट्रवादीने जिंकल्या आहेत. राष्ट्रवादीच्या संघर्ष ग्रामविकास मंडळाच्या पॅनलला मठ पिंपरीमध्ये एकूण ३ जागा मिळाल्या आहेत.

सोलापूरमधील कुसमोड गावात विजयसिंह आणि धवलसिंह गटाला समान जागा मिळाल्याचे समोर येत आहे.

कोल्हापूरमधील हातकणंगलेतल्या पाडळीच्या ग्रामपंचायतीमध्ये जनसुराज्य सरशी यला मिळत आहे. हातकणंगलेमधल्या पाडळीच्या ११ पैकी ११ जागा जनसुराज्य पक्षाकडे गेल्या आहेत. दसुर, तोंडले, शेंडेचिंच या तीन ग्रामपंचायतीवर भाजपचा विजय झाला आहे.

हिवरे बाजारात पोपट राव पवार यांचे विजय

कराडच्या खालकरवाडी ग्रामपंचायत राष्ट्रवादी काँग्रेसने जिंकली.

कराडमधील खुबी ग्रामपंचायतीमधील सर्व ९ जागा भाजपकडे आल्याचे समोर येत आहे. भाजपच्या अतुल भोसले गटाने खुबी ग्रामपंचायत जिंकली आहे.


 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.