Gram Panchayat Election Results : राज्यातील पहिला निकाल आला

एमपीसी न्यूज : राज्यातील ग्रामपंचायत निवडणुकीचा पहिला निकाल समोर आला आहे. कोल्हापूर जिल्ह्यातल्या हातकणंगले तालुक्यातील पाडळी ग्रामपंचायतीवर जनसुराज्य पक्षाने बाजी मारली असून गोराई ग्राम विकास आघाडीच्या 11 जागा निवडून आल्या आहेत. यामुळे कार्यकर्त्यांनी मोठा जल्लोष केला असून हातकणंगले तालुक्यातील पहिल्या ग्रामपंचायतीचा निकाल जाहीर झाला आहे. 

_MPC_DIR_MPU_II

राज्यात पार पडलेल्या ग्रामपंचायत निवडणुकीचा निकाल   आज (सोमवार) लागणार आहे. कुठे सकाळी 8 वाजल्या 10 वाजल्यापासून निकालाला सुरुवात होणार आहे. यासाठी प्रशासनाने जय्यत तयारी केली आहे. सगळ्यांचंच या निवडणुकीच्या निकालाकडे लक्ष लागलेलं आहे. काही मिनिटांवर निकाल असल्याने उमेदवारांची ‘दिल की धडकन तेज’ झाली आहे असंच म्हणायला हवं.

हातकणंगले आणि शिरोळ तालुक्यातील ग्रामपंचायतीच्या मतमोजणीला लवकर सुरुवात झाली. या ठिकाणी कोणतीही गडबड होऊ नये म्हणून मतदान अधिकारी व पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवला आहे. मतदानाचा निकाल ऐकण्यासाठी उमेदवाराच्या कार्यकर्त्यांनी तालुक्यात कार्यालयासमोर मोठी गर्दी केली आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.