Lord Parashuram: भगवान परशुराम कुंड आमंत्रण रथाचे पुण्यात भव्य स्वागत व शोभायात्रेचे आयोजन

एमपीसी न्यूज : भगवान परशुराम (Lord Parashuram) कुंड आमंत्रण रथ यात्रेचे पुण्यात स्वागत व शोभयायात्रेचे आयोजन आज 23 नोव्हेंबर रोजी दुपारी 4 वाजता करण्यात आले आहे.

भगवान परशुराम यांच्या भव्य शिल्पाच्या उभारण्याचे काम सुरू आहे. हे शिल्प त्यांच्या जन्मस्थळी अरुणाचल प्रदेश येथे केंद्र सरकारच्यावतीने उभारण्यात येणार आहे. या वास्तूचा पर्यटनस्थळ म्हणून विकास होत आहे.

पुणे हादरले! सहा जणांकडून कोयत्याने आणि दगड विटांनी मारहाण करून सराईताचा खून

याचा प्रसार व प्रचार संपूर्ण भारतभर होण्यासाठी ही रथयात्रा कांचीकामकोटी मठापासून 8 नोव्हेंबर पासून सुरुवात झाली असून तिचे आगमन बुधवार 23 नोव्हेंबर रोजी पुण्यात होत आहे.

शोभायात्रेचा मार्ग पुढीलप्रमाणे :
• सुरुवात व स्वागत – श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंदिर,
• लक्ष्मीरोड शगून चौक
• भानुविलास टॉकीज चौक डावीकडून पेरुगेट पोलिस चौक
• टिळक स्मारक मंदिर चौक
• ग्राहक पेठेच्या डावीकडून खजिना विहीर चौक
• समाप्ती- उद्यान प्रसाद कार्यालय

तरी सर्वांनी या शोभयायात्रेमध्ये सहभागी होण्याचे आवाहन आयोजकांतर्फे करण्यात आले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.