Pune News : कालव्यात बुडणाऱ्या नातीला वाचविण्यासाठी आजोबा धावले, पण पाण्यात बुडून दोघांचाही मृत्यू

एमपीसी न्यूज : पुणे जिल्ह्यातील आंबेगाव तालुक्यातून एक दुर्दैवी घटना घडली आहे. डिंभे धरणाच्या डाव्या कालव्यात बुडणाऱ्या नातीला वाचवण्यासाठी गेलेल्या आजोबांचाही बुडून दुर्दैवी मृत्यू झाला. चास जवळील शेगरमळा येथे ही घटना घडली. अन्विता शेगर (वय 8) आणि सदाशिव शेगर (वय 60) अशी बुडून मृत्युमुखी पडलेल्यांची नावे आहेत. 

याप्रकरणी अधिक माहिती अशी की, मंगळवारी दुपारी बारा वाजण्याच्या सुमारास शेगरमळा येथे अन्विता (वय-8) ही मंगळवारी डिंभे धरणाच्या डाव्या कालव्याच्या पाण्यात पडली होती. याची माहिती मिळताच तिला पाण्यातून काढण्यासाठी कॅनॉलच्या जवळ शेतात काम करणारे अन्विताचे आजोबा सदाशिव शेगर (वय-60) यांनी कॅनॉलच्या पाण्यात उडी मारली. परंतु तेही पाण्यात बुडाले.

दरम्यान ही माहिती गावात पसरताच घटनास्थळी मोठी गर्दी जमा झाली. जमलेल्यापैकी काही नागरिकांनी दोघांनाही कालव्यातून बाहेर काढत तातडीने घोडेगाव येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. मात्र या दोघांनाही डॉक्टरांनी मयत घोषित केले.

.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.