Chinchwad : शहिदांच्या वीरपत्नींसाठी “कृतज्ञता वंदन” कार्यक्रम 

एमपीसी न्यूज – महाराष्ट्रात सर्व ठिकाणी हळदी कुंकवाचा कार्यक्रम महिला वर्गामध्ये उत्साहाने राबवला जात असताना वीरपत्नी त्यापासून वंचित राहत असतात याकरिता प्रताप भोसले यांच्या संकल्पनेतून मकर संक्रातीच्या निम्मिताने शहिदांच्या वीर पत्नींना धीर देण्यासाठी “कृतज्ञता वंदन” या कार्यक्रमाचे आयोजन केले. सीमेवर जावान देशाचे रक्षण करत असतात आणि देश सेवेसाठी आपल्या प्राणाची आहुती द्यायलाही मागे पुढे पाहत नाहीत. देशासाठी बलिदान देणाऱ्या वीर पत्नीचा यथोचित सन्मान आपण केला पाहिजे. या भावनेतून स्मिता सुधीर माने यांचे घरी आज “कृतज्ञता वंदन” हा कार्यक्रम संपन्न झाला.

कार्यक्रमाच्या निम्मित वीरपत्नी निशा चंद्रकांत गलांडे, वीरपत्नी सोनाली सौरभ फराटे, वीरपत्नी जयश्री सोपान शेळके, वीरपत्नी शोभा नारायण ठोंबरे, वीरपत्नी शितल संतोष जगदाळे, वीरपत्नी भाविका बंजारे यांना तिळगूळ देऊन सन्मान करण्यात आला. याप्रसंगी शुभांगी उमेश सरोते (व्हाईस प्रेसिडेंट) महिला ब्रिगेड राष्ट्रीय सैनिक संस्था आणि प्रताप भोसले (अध्यक्ष ) राष्ट्रीय सैनिक संस्था उपस्थित होते.

केवळ देश भक्तीपर गीते गाऊन आणि सिनेमे बघून देश भक्ती सिद्ध होत नाही तर शहिदांनी दिलेल्या बलिदानाचा आणि त्यांच्या परिवाराचा यथोचित सन्मान करून आपण आपले सामाजिक कर्तव्य पार पडले पाहिजे. तसेच त्यांच्या बलिदानाची माहिती नव्या पिढीपर्यंत पोहचवले पाहिजे, असे मत कार्यक्रमाचे आयोजक प्रताप भोसले यांनी व्यक्त केले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.