India Corona Update : मोठा दिलासा ! ॲक्टिव्ह रुग्णसंख्या एक लाखांवर, 24 तासांत 6,990 नवे कोरोना रुग्ण

एमपीसी न्यूज – भारतात कोरोना संसर्गाचा विळखा सैल होत आहे. गेल्या 24 तासांत देशभरात 6 हजार 990 नव्या कोरोना बाधित रुग्णांची नोंद झाली असून, 10 हजार 116 बरे झालेल्या रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. यासह ॲक्टिव्ह रुग्णसंख्या कमी झाली असून, ती एक लाखांवर पोहोचली आहे. सध्या 1 लाख 543 ॲक्टिव्ह रुग्णांवर उपचार सुरू आहेत. 
आरोग्य मंत्रालयाच्या हवाल्याने ‘एएनआय’ने प्रसिद्ध केलेल्या आकडेवारीनुसार, भारतातील एकूण कोरोना बाधित रुग्णांची संख्या 3 कोटी 45 लाख 87 हजार 822 एवढी झाली आहे. त्यापैकी 3 कोटी 40 लाख 18 हजार 299 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. देशाचा रिकव्हरी रेट वाढून 98.35 टक्के एवढा झाला आहे.

 

देशात गेल्या 24 तासांत 190 कोरोना रुग्णांचा मृत्यू झाला असून, कोरोनामुळे देशात आजवर 4 लाख 68 हजार 980 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. देशाचा कोरोना मृत्यूदर 1.36 टक्के एवढा झाला आहे.
कोरोना प्रतिबंधक लसीकरण कार्यक्रमाअंतर्गत देशात आत्तापर्यंत 123 कोटी 25 लाख 02 हजार 767 नागरिकांना लस टोचण्यात आली आहे. गेल्या 24 तासांत देशभरात 78 लाख 80 हजार 545 नागरिकांनी कोरोना प्रतिबंधक लस घेतली आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.