Pimpri-Chinchwad Corona Update: मोठा दिलासा! रुग्णसंख्या 50 च्या आत, शहरात आज 48 नवीन रुग्णांची नोंद 53 कोरोनामुक्तांना डिस्चार्ज

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड शहरातील कोरोनाच्या रुग्णसंख्येचा आलेख चांगलाच उतरणीस आला आहे.  शहराच्या विविध भागातील 48 नवीन कोरोना बाधित रुग्णांची आज (शनिवारी) नोंद झाली. गेल्या नऊ महिन्यांतील आजची रुग्णसंख्या सर्वांत निच्चांकी आहे. रुग्णसंख्येत मोठी घट होत असल्याने दिलासा मिळाला आहे. तर, उपचाराला दहा दिवस पूर्ण झालेल्या आणि कोणतीही लक्षणे नसलेल्या 53 जणांना डिस्चार्ज देण्यात आला.

शहरातील 2 रुग्णांचा आज मृत्यू झाला. आजपर्यंत शहरातील 4 हजार 471 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला. शहरातील 2 लाख 75 हजार 280 जणांना आजपर्यंत कोरोनाची लागण झाली. सध्या 869 सक्रिय रुग्ण शहरात आहेत. त्यातील 556  रुग्ण गृहविलगीकरणात असून 313 सक्रीय रूग्णांवर महापालिका रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत.

तर, शहरात मेजर कंटेन्मेंट झोन 37 आणि मायक्रो कंटेन्मेंट झोन 355 आहेत. आज दिवसभरात 416 नागरिकांचे लसीकरण झाले. आजपर्यंत 21 लाख 47 हजार 145 जणांनी कोरोना प्रतिबंधक लस घेतली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.