India Corona Update : मोठा दिलासा ! मार्च 2020 नंतर पहिल्यांदाच रिकव्हरी रेट 98.15 टक्क्यांवर 

एमपीसी न्यूज – भारतातील कोरोना संसर्गाचा वेग मोठ्या पशंगेल्या 24 तासांत 14 हजार 623 नव्या कोरोना रुग्णांची नोंद झाली असून, 19 हजार 446 बरे झालेल्या रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. देशाचा रिकव्हरी रेट वाढून 98.15 टक्के एवढा झाला आहे. मार्च 2020 नंतर पहिल्यांदाच रिकव्हरी रेट एवढा झाला आहे. 

आरोग्य मंत्रालयाच्या हवाल्याने एएनआयने प्रसिद्ध केलेल्या आकडेवारीनुसार, भारतातील एकूण कोरोना बाधित रुग्णांची संख्या 3 कोटी 41 लाख 08 हजार 996 एवढी झाली आहे. त्यापैकी 3 कोटी 34 लाख 78 हजार 247 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. देशातील ॲक्टिव्ह रुग्ण संख्येत लक्षणीय घट झाली असून, सध्या 1 लाख 78 हजार 098 ॲक्टिव्ह कोरोना रुग्णांवर उपचार सुरू आहेत.

गेल्या 24 तासांत देशभरात 197 रुग्ण दगावले असून, आजवर 4 लाख 52 हजार 651 रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. देशाचा कोरोना मृत्यूदर 1.32 टक्के एवढा झाला आहे. आयसीएमआरच्या आकडेवारीनुसार, देशात आजवर 59 कोटी 44 लाख 29 हजार 890 चाचण्या पूर्ण झाल्या आहेत तर, गेल्या 24 तासांत 13 लाख 23 हजार 702 नमूने तपासण्यात आले आहेत.

 

भारतात कोरोना लसीकरण कार्यक्रमाअंतर्गत आत्तापर्यंत देशात 99 कोटी 12 लाख 82 हजार 283 नागरिकांनी कोरोना प्रतिबंधक लस घेतली आहे. गेल्या 24 तासांत देशभरात 41 लाख 36 हजार 142 जणांनी लस घेतली आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.