India Corona Update : मोठा दिलासा ! मे 2020 नंतरची सर्वात निचांकी कोरोना रुग्ण वाढ

एमपीसी न्यूज – गेल्या 24 तासांत देशभरात 2 हजार 568 नव्या कोरोना बाधित रुग्णांची नोंद झाली असून, 97 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. ही मे 2020 नंतरची सर्वात निचांकी रुग्ण वाढ आहे. देशातील नागरिकांसाठी ही मोठी दिलासादायक बाब आहे. 

आरोग्य विभागाच्या आकडेवारीनुसार, देशात आजवर 4 कोटी 29 लाख 96 हजार 062 जणांना कोरोनाची बाधा झाली आहे. त्यापैकी 4 कोटी 24 लाख 46 हजार 171 रूग्ण बरे झाले आहेत. गेल्या 24 तासांत 4 हजार 722 जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. देशाचा रिकव्हरी रेट वाढून 98.72 टक्के एवढा झाला आहे.

सध्या देशात 33 हजार 917 ॲक्टिव्ह रुग्ण आहेत. आजवर 5 लाख 15 हजार 974 रुग्ण कोरोनामुळे मृत्यूमुखी पडले आहेत. देशाचा मृत्यूदर 1.20 टक्के एवढा झाला आहे.

ICMR च्या आकडेवारी नुसार देशात आजवर 77.97 कोटी प्रयोगशाळा नमुने तपासण्यात आले आहेत. गेल्या 24 तासांत 7.01 चाचण्या घेण्यात आल्या आहेत. देशात कोरोना लसीकरण कार्यक्रमाअंतर्गत आजवर 180.40 कोटी नागरिकांना कोरोना प्रतिबंधक लस टोचण्यात आली आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.