India Corona Update : मोठा दिलासा ! देशातील ॲक्टिव्ह रुग्णसंख्या 50 हजारांच्या खाली 

एमपीसी न्यूज – गेल्या 24 तासांत देशभरात 3 हजार 393 नव्या कोरोना बाधित रुग्णांची नोंद झाली आहे. तर, 8 हजार 055 जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. देशातील ॲक्टिव्ह कोरोना रुग्णसंख्या 50 हजारांच्या खाली आली असून, देशवासीयांना मोठा दिलासा मिळाला आहे. 

देशात सध्याच्या घडीला 49,948 ॲक्टिव्ह कोरोना रुग्ण आहेत. आरोग्य विभागाच्या आकडेवारीनुसार, देशात आजवर 4 कोटी 29 लाख 62 हजार 953 जणांना कोरोनाची बाधा झाली आहे. त्यापैकी 4 कोटी 24 लाख 06 हजार 150 रूग्ण बरे झाले आहेत. देशाचा रिकव्हरी रेट वाढून 98.68 टक्के एवढा झाला आहे.

एमपीसी न्यूज पॉ़डकास्ट… पुणे, पिंपरी-चिंचवडसह राज्यातील ठळक घडामोडींचा धावता आढावा ऐकण्यासाठी ही लिंक क्लिक करा…

गेल्या 24 तासांत 108 कोरोना रुग्णांचा मृत्यू झाला आहे. आजवर 5 लाख 15 हजार 210 रुग्ण कोरोनामुळे मृत्यूमुखी पडले आहेत. देशाचा मृत्यूदर 1.20 टक्के एवढा झाला आहे.


प्रवासी एन्जॉय करतायत मेट्रोचं स्वर्ग सुख‘! पिंपरी-फुगेवाडी मेट्रो प्रवास.. Day 2 | Ground Report व्हिडिओ पाहण्यासाठी ही लिंक क्लिक करा…

ICMR च्या आकडेवारी नुसार देशात आजवर 77.43 कोटी प्रयोगशाळा नमुने तपासण्यात आले आहेत. गेल्या 24 तासांत 8.73 चाचण्या घेण्यात आल्या आहेत. देशात कोरोना लसीकरण कार्यक्रमाअंतर्गत आजवर 179 कोटी 13 लाख 41 हजार 295 जणांना लस टोचण्यात आली आहे. चोवीस तासांत 21.34 जणांना लस टोचण्यात आली आहे.

एमपीसी न्यूज शिक्षण संवाद | काऊंटडाऊन दहावी | दहावीच्या भूमितीची तयारी करूयात दहा दिवसांत – मनोज उल्हे | अत्यंत उपयुक्त व्हिडिओ पाहण्यासाठी ही लिंक क्लिक करा…

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.