Pimpri : शाडू मातीच्या गणपती मूर्ती बनविण्याच्या कार्यशाळेस महिला व विद्यार्थ्यांचा मोठा प्रतिसाद

एमपीसी न्यूज – प्लास्टर ऑफ पॅरिसच्या वापरामुळे होणारे पर्यावरणाचे नुकसान टाळण्यासाठी घेण्यात आलेल्या शाडू मातीचे गणपती बनविण्याच्या कार्यशाळेस मोठा प्रतिसाद मिळाला. सामाजिक उपक्रमास पूर्णानगर, फुलेनगर, घरकुल या भागातील महिला, विद्यार्थी व नागरिकांनी पर्यावरणपूरक पद्धतीने शाडूच्या मातीने गणपती मूर्त्या मोठ्या उत्साही वातावरणात बनविल्या.

प्रभाग क्रमांक 11 मधील महात्मा फुले नगर बॅडमिंटन हॉल येथे घेण्यात आली. महापालिकेचे सभागृह नेते एकनाथ पवार, इसिएचे विकास पाटील यांच्यासह परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

अत्यंत उत्साही वातावरणात शाडू मातीचे गणपती बनविण्याची कार्यशाळा संपन्न झाली. या कार्यशाळेत 200 हून अधिक शाडू मातीचे गणपती बनविले. आपल्या घरी हीच सुंदर मूर्ती यंदा बसविण्याचा संकल्प यावेळी करण्यात आला.

एकनाथ पवार म्हणाले, पर्यावरण रक्षणात आपलाही हात लागावा म्हणून ही कार्यशाळा आयोजित केली गेली. प्लास्टर ऑफ पॅरीसच्या गणेश मूर्ती विसर्जनानंतरही कित्येक दिवस पाण्यात विघटित होत नाहीत. त्यामुळे त्यांची विटंबनाही होते. रासायनिक रंगामुळे नद्या, तलाव, विहिरीमधील पाणी प्रदूषित होते. याला रोखण्यासाठीच प्लास्टर ऑफ पॅरीसच्याऐवजी शाडूच्या मातीचा जास्तीत वापर होणे गरजेचे आहे. त्यामुळे घरोघरी शाडू मातीपासून तयार झालेले गणपती स्थापन होतील, तेव्हाच ख-या अर्थाने पर्यावरणाचे तसेच संस्कृतीचे रक्षण होईल.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.